प्रफुुुल्ल कुलकर्णी,ज्योतिषभास्कर, सामुद्रिक मार्तंड
8888747274
लालू प्रसाद यांचा जन्म 11 जून 1948 रोजी झाला, पाटणा विद्यापीठात विदयार्थी नेता म्हणून त्यांचा राजकारणात उदय झाला. वयाच्या 29 वर्षी ते लोकसभेतून निवडून आले. ते उच्य शिक्षित असून 2004 साली पाटणा विद्यपीठाने त्यांना डॉक्टरेट पदवीने गौरविले.
1980 ते 1989 पर्यंत बिहार विधान परिषदेत निवडून आले, 1989 साली परत दुसर्यांदा लोकसभेसाठी निवडून आले. 1990 ते 1997 पर्यंत बिहारचे मुख्यमंत्री होते. 1996 साली चारा घोटाळ्यात लालू अडकले. 1998 साली लोकसभेसाठी तिसर्यांदा निवडून आले. 2004 साली परत चौथ्या वेळेस लोक सभेवर निवडून आले व यूपीए सरकारला पाठिंबा देण्याच्या बदल्यात त्यांनी रेल्वे मिनिस्टर चे पद मिळवले. त्या वेळेस त्यांनी त्यांची बिहारच्या राजकारणावर आपली पकड राहावी यासाठी त्यांनी पत्नी राबडी देवी यांना बिहारचे मुख्यमंत्री केले.
2009 साली पाचव्यांदा लोकसभेसाठी निवडून आले, परंतु न्यायालयाने 1913 साली, फोजदारी संहितेत शिक्षा झालेल्या व्यक्तीला लोकसभेचे सदस्य राहता येणार नाही असा निकाल दिल्यामुळे, त्यांना खासदारपदाचा राजीनामा द्यवा लागला.
लालू प्रसाद पिछड्या जन जातीचे असल्याने त्यांनी राजकारणात काँग्रेसची मुस्लिम समाजाची मते वळवण्यात ते कायम यशस्वी झाले. लालू प्रसाद बिहारच्या मुख्यमंत्री पदावर असताना किंवा राबडीदेवी मुख्यमंत्री असताना बिहार राज्याची कायदा व सुव्यवस्था व्यवस्था अतिशय हालाखीची होती.
2015 लालू प्रसाद यादव व नितीशकुमार यांनी विधान सभेत बहुमत मिळवून सत्ता स्थापना केली, परंतु नितीश कुमार यांनी लालू प्रसाद यांचा सत्तेतून पत्ता कट केला. जुलै 2017 साली लालू प्रसाद यांच्या विरोधात व उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्या विरोधात निरनिराळे गुन्हे
ईडीने दाखल केले. जानेवारी 2018 मध्ये लालू प्रसाद यांना न्यायालयाने दोषी ठरवून शिक्षा दिली. लालू प्रसाद यांचे पुत्र तेजस्वी यादव, कन्या मिसा भारती यांच्या विरोधात विविध कलमांखाली अनेक प्रकरणातील अपहाराबद्दल गुन्हे दाखल आहेत.
990 ते 1995 दरम्यान कोट्यावधी रुपयांचा चार घोटाळा झाला, या घोटाळ्या विरोधात 1996 साली गुन्हा दाखल झाला. न्यायालयीन लढ्यात खूप वर्ष निघून गेली व सरते शेवटी 13 सप्टेंबर 2013 रोजी लालू प्रसाद यांच्या बरोबर 53 लोक दोषी ठरले व त्यांना शिक्षा झाली, यात काही आयएएस अधिकारी यांना सुद्धा शिक्षा झाली.
विविध घोटाळ्यात लालू यादव यांच्यावर गुन्हे दाखल होते. कुठलीही पार्श्व भूमी नसताना भारता च्या राजकारणात संधी साधून उदयाला आलेले हे वादग्रस्त व्यक्तिमत्व.
लालू प्रसाद यादव यांच्या हातावरील सर्व ग्रह हे प्रबळ व बलवान आहेत. चतूर बुद्धिवान व निर्णय क्षमता असलेल्या ग्रहांची देणगी व साथ आहे. प्रत्येक बोटाचे पहिले पेर फुगीर असल्याने दादागिरीच्या ‘ग‘ ची बाधा झालेली हाच तेवढा दोष आहे. सर्व ग्रहांच्या तुलनेत गुरु ग्रह बलवान नाही त्यामुळे न्यायी, निस्वार्थी, त्यागी भावना त्यांच्या ठायी वसत नाही.
हातावरील 8 नंबरच्या बाणाने दाखविलेली आडवी रेषा ही रवि, भाग्य व हृदय रेषेला आडवी गेल्याने व शेवटी आयुष्य रेषेला मिळाल्याने लालूंच्या नशिबाला आडवी जाणारी रेषा हि लालूंचा शेवट करणारी. मान-सन्मान. कीर्ती,सत्ता या पासून लांब नेणारी व राज भय, दंड शिक्षा भय दाखविते.
हि आडवी रेषा लालूंच्या 65 व्या वय वर्षाला आडवी गेल्याने त्यांच्या आयुष्यातील उतरणीच्या काळाला खर्या अर्थाने सुरवात झाली.
1 नंबरच्या बाणाने दाखविलेली हृदय रेषा आहे, आयुष्य रेषा व हृदय रेषेत अंतर आहे त्यामुळे स्वयं निर्णय क्षमता दाखविते.
2 नंबरच्या बाणाने दाखविलेले अंगठ्यावरील यव चिन्ह आर्थिक संपन्नता देते.
3 नंबरच्या बाणाने दाखविलेले अंगठ्याचे दुसरे पेर लांब व मोठे आहे, त्यामुळे ह्यांची प्रवृत्ती एकदा हातात घेतलेले काम संपविण्याची असते.
4 नंबरच्या बाणाने दाखविलेली दाखविलेली उत्कर्ष रेषा आहे या काळात ते बिहारचे मुख्यमंत्री होते.
5 नंबरच्या बाणाने दाखविलेली आयुष्यातील सर्वोत्कृष्ट काळ दाखविते या काळात ते केंद्रीय रेल्वेमंत्री होते. 6 नंबरच्या बाणाने दाखविलेली भाग्यरेषा आहे ही रेषा जाड असून पैशांची तंगी दाखवते, साधारण आर्थिक परिस्थिती दाखविते.
7 नंबरच्या बाणाने दाखविलेली रवी रेषा आहे हि तरुण वयातच मान सन्मान व कीर्ती दाखवते.
9 नंबरच्या बाणाने दाखविलेली रवी ग्रहावरून बुद्ध ग्रहाच्या पर्यंत गेलेली सर्व दूर राष्ट्रीय व अंतर राष्ट्रीय मान सन्मान दाखविते.
हस्त सामुद्रिकशास्त्राप्रमाणे ज्यांच्या अंगठ्याचे पहिले पेर फुगीर असेल व अंगठा गदेसारखा दिसत असेल तर असे लोक भयंकर तापट स्वभावाचे मागचा पुढचा विचार न करता शास्राने हल्ला करणारे, खिशात कायम सूरा अथवा कट्टा घेऊन फिरणारे, दहशत निर्माण करणारे लोक असतात.
लालू प्रसाद यांच्या अंगठ्याचे पहिले पेर तर फुगीर व गोलाईयुक्त आहेच शिवाय चारही बोटांची पहिली पेरे सुद्धा फुगीर आहेत. अशी बोटांची रचना व परिस्थिती असता असे लोक साम, दाम,दंड भेद नीतीमध्ये विश्वास ठेवतात.
निडर असतात त्यातच लालूंचा जन्म गरीब परिस्थितीत झालेला व पिछड्या जातीचे असल्याने महाविद्यालयीन पर्यंतचे आयुष्य अपमान सहन करत गेलेले. सुशिक्षित असल्याने श्री. जयप्रकाश नारायण यांच्या चळवळीने प्रेरणा घेतलेले परंतु वयाच्या 29 वर्षी खासदार झाल्याने तात्कालिक भारताच्या राजकीय अवस्थेचा त्यांनी फायदा उठवला नसता तर नवल झाले असते.
लालूंचा मूळ प्रवृत्ती निडर हम करे सो कायदा ही मानसिकता असल्याने लालू प्रसाद हे कधीच कोणाला घाबरले नाही. भ्रष्टाराच्या कैक आरोपांना सामोरे जाताना ते बेफिकीर होते. स्वतः कायद्याची पदवी घेतली असल्याने, कायद्यातील सर्व पळवाटा त्यांना माहित होत्या . 1996 पासून च्या न्यायालयीन लढ्यात वीस वर्षाने सर्वोच्च नायलयाने 2017 रोजी शिक्षा सुनावली. कदाचित सरकार बदलले नसते तर लालू अजूनही यू पी ए सरकारात उच्च पदस्थ मंत्री असते.