Sunday, May 18, 2025
Homeभविष्यवेधतुळशी माळ गळा...

तुळशी माळ गळा…

सनातन धर्मात तुळशीला अतिशय पूजनीय मानले आहे. भगवान विष्णू यांना प्रिय असल्यामुळे तुळशीला हरी वल्लभा देखील म्हणतात. भगवान विष्णूंच्या नैवेद्यात आवर्जून तुळस वापरतात.

- Advertisement -

तुळशीचे धार्मिक महत्त्व असण्याव्यतिरिक्त आयुर्वेदिक महत्त्व देखील आहे. बरीच औषधे बनविण्यासाठी तुळशीचा वापर केला जातो.

सर्दी पडसं आणि हंगामी फ्लू मध्ये देखील तुळशीच्या पानांचा काढा बनवून वापर केला जातो. तुळशीची माळ घालण्याचे अनेक फायदे सांगितले आहे.

पण आपणास माहीत आहे का, की ही माळ घातल्याने अनेक आरोग्यविषयक फायदे होतात. या माळेचे धार्मिक महत्त्व असण्यासह वैज्ञानिक महत्त्व देखील आहेत. चला तर मग जाणून घेऊ या तुळशीची माळ गळ्यात घालण्याचे फायदे. किंवा धार्मिक महत्त्व –

  • तुळशीची माळ गळ्यात घातल्यानं मन आणि आत्मा दोन्ही शुद्ध होतात.

  • माणसाची आध्यात्मिक प्रगती होते ज्यामुळे तो स्वतःला देवाच्या जवळ अनुभवतो.

  • तुळशीची माळ घातल्यानं सन्मान आणि सौभाग्य लाभतं.

  • मनात सकारात्मकता विकसित होते.

  • मानसिक शांतता मिळते.

  • दररोज तुळशीची पाने चावून खाल्ल्याने शरीर निरोगी होतं.

तुळशीची माळ घालण्याचे वैज्ञानिक महत्त्व आणि आरोग्यविषयक फायदे

एका संशोधनात आढळून आले आहे की मेंदू आणि शरीरास जोडून ठेवण्यासाठी तुळशीची माळ प्रभावी आहे. तुळशीची माळ गळ्यात घातल्याने आपल्या शरीराच्या काही महत्त्वाच्या अ‍ॅक्युप्रेशर पॉइंट्सवर दाब येतो, ज्यामुळे मानसिक ताण दूर होण्यास मदत होते.

तुळशीच्या लाकडामध्ये एक विशिष्ट प्रकाराचा द्रव आढळतो जे मानसिक ताणाला दूर करतो. या मुळे आपले मानसिक आरोग्य चांगले राहते.

हे घातल्याने शरीरात विद्युत ऊर्जेचा प्रवाह चांगला होतो. तुळशीची माळ घातल्यानं विद्युत ऊर्जा प्रवाह सुरळीत होण्यामुळे आपल्या शरीरातील रक्ताभिसरण चांगलं होत. तुळशीची माळ शरीरास स्पर्श झाल्यामुळे कफ आणि वातदोषांपासून आराम मिळतो.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Ashish Ubale : धक्कादायक! ‘गार्गी’ चित्रपटाच्या दिग्दर्शकाची आत्महत्या; गळफास घेत संपवलं...

0
नागपूर | Nagpur चित्रपटसृष्टीतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध लेखक आणि दिग्दर्शक आशिष उबाळे यांनी आत्महत्या केल्याची घटना उघड झाली आहे....