Friday, May 3, 2024
Homeभविष्यवेधसाप्ताहिक राशीभविष्य - Weekly Horoscope

साप्ताहिक राशीभविष्य – Weekly Horoscope

ज्यो. श्री रवींद्र भगवान पाठक

मेष – कायदेशीर बाबी सांभाळा

- Advertisement -

लहान-मोठया समस्या बाजूला सारल्या तर वेळ तुमच्यासोबत आहे. सार्वजनिक ठिकाणी प्रतिष्ठा वाढेल. कुटुंबीयांसोबत वाद होऊ शकतो. इतरांची बाजू नीट ऐकूनच कोणताही निर्णय द्या. कामासाठी घरापासून दूर जाल. कायदेशीर बाबी सांभाळा. उत्तरार्धात खरेदी विक्री वाढेल. संपत्ती लाभ, वारसा लाभ संभवतो. शारीरिक तक्रारीकडे लक्ष द्या. धंद्याकडे दुर्लक्ष करू नका नवा व्यवसाय सुरू करताना मित्रांची मदत घेतल्याने फायदा होईल. स्त्रियांसाठी खूप चांगली वेळ आहे. अपत्यप्राप्तीचा सुखद योग आहे. शुभ तारखा : 25,28

वृषभ – विपरीत घटनेतून लाभ संभवतो

या महिन्यात धनप्राप्तीचे आकस्मिक योग जुळून येत आहेत. पोटदुखी जाणवेल. प्रवास घडेल. उत्तरार्धात वरिष्टांची गैरमर्जी होऊ शकेल. हौसमौज कराल. दागिने घ्याल. विपरीत घटनेतून लाभ संभवतो. जर आपल्या डोक्यावर कर्ज असेल तर या महिन्यात ते फेडून टाकण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. जी कामं केवळ डोक्यातच कल्पनेच्या स्वरूपात होती ती आता वास्तवात उतरण्याची शक्यता आहे. ही आपल्या यशोगाथेतील एक मोठी झेप ठरेल. या काळात एखाद्या प्रभावी व्यक्तीला भेटणे शक्य होते. ज्याच्या मदतीने आपल्या समस्या कमी होतील आणि काही वाईट कामे केली जातील. कोर्ट-कार्यालयाशी संबंधित वाद कोर्टाबाहेर निकाली काढणे चांगले.शुभ तारखा : 28,29

मिथुन – मालमत्तेची खरेदी फ़ायदेशीर

कामात यश मिळेल. वाहन आणि मालमत्तेची खरेदी वगैरे तुमच्यासाठी फ़ायदेशीर ठरेल. अर्धवट आणि अडलेल्या कामांना गती येईल. आरोग्याप्रती बेपर्वाई तुम्हाला महागात पडू शकते. धर्माप्रती आवड वाढेल. मित्रांची मदत मिळेल. लक्षात असू द्या, क्रोध सगळ्यात आधी तुमचे नुकसान करतो, म्हणून रागावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. वैवाहिक जीवनात संशय घातक ठरू शकतो. या विषयावर जोडीदारासोबत चर्चा करून तोडगा काढा. उत्तरार्धात प्रवास घडेल. पोटदुखी जाणवेल. जवळच्या व्यक्तींना दुरावू नका. विवाह जुळतील. नवीन रोजगार मिळेल. शुभ तारखा : 27,30

कर्क – संघर्षातून यश मिळेल

महिना अखेरीस चांगली बातमी कळू शकेल. एखाद्या जुन्या मित्राची भेट होऊ शकते. विदेशातही जाऊ शकता. काहीतरी नवे घडणारच आहे. मिळकतीचे नवे पर्याय उपलब्ध होतील. प्रॉपर्टीत गुंतवणुक करणे फायद्याचे ठरेल. तुमच्या अपत्याला तुमचा वेळ हवा आहे, हे ध्यानात असू द्या. मनाची कुचंबणा होईल. उत्तरार्धात संघर्षातून यश मिळेल. वैवाहिक जीवनात त्रास संभवतो. अतिआत्मविश्वास राहील. आठवड्याच्या शेवटी आपल्याला आवश्यक असलेली एखादी वस्तू खरेदी करण्यासाठी जास्त पैसे खर्च करणे बजेट डळमळीत करू शकते. शुभ तारखा : 26, 27

सिंह – आर्थिक अडचणी उद्भवू शकते

घरगृहस्थीची चिंता राहील. कुटुंबाला आधार द्याल. उत्तरार्धात शिक्षणात अडचणी येतील. संततीला त्रास संभवतो. सुवर्णालांकारांची खरेदी कराल. मानसिक उन्नती होईल. मित्रासोबत नवा व्यवसाय सुरू केल्यास कालांतराने लाभ होईल. वेळेचे महत्त्व ओळखा. तुम्ही जरा व्यावहारिक झाले पाहिजे, अति भावनिकता तुमचे नुकसान करू शकेल. वडिलांचे स्वास्थ्य तुम्हाला काळजीत पाडेल. अनावश्यक गोष्टींमध्ये पैसे खर्च करणे टाळा. आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू शकत. विद्यार्थी कठोर परिश्रमांवर यशस्वी होतील. शुभ तारखा : 25, 27

कन्या – अडकलेले धन परत मिळेल

जीवनात नवा रंग भरण्याची वेळ आली आहे. कामे यशस्वी होतील. कुटुंबात मनमानी कराल. विवाह जुळतील. जुन्या गोष्टी विसरून मार्गक्रमण करा. वातावरणाचा आनंद लुटा. शैक्षणिक कार्यात खर्च होईल. जोडीदाराचे वागणे तुमच्यासाठी साहाय्यकारी सिद्ध होईल. या महिन्यात तुमच्यासाठी सर्वकाही सामान्य राहील. नव्या लोकांच्या ओळखी होतील, ज्या पुढे लाभदायक ठरतील. नोकरीसाठी एखाद्या नव्या शहरात जाऊ शकता. अड्कलेले धन परत मिळेल. जोडीदार तुमच्यासाठी पर्वतासमान सिद्ध होईल. शुभ तारखा: 26, 30

तूळ – नवे घर, वाहन खरेदी कराल

काम वेळेत पूर्ण होतील. योजना पूर्ण होतील. 15 तारखेनंतर कोणत्याही नव्या कामाची सुरुवात करा. आर्थिक प्राप्ती जेमतेम राहील. संघर्षातून यश मिळेल. निवडणुकीत यश मिळेल. परदेशगमन घडेल. महत्वाकांक्षी रहाल. बॉस तुमच्या कामावर युश होईल. सहकर्मचारी सहाय्य करतील. कलाक्षेत्राशी संबंधित लोकांसाठी ही चांगली वेळ आहे. स्वास्थ चांगले राहिल. नवे घर किंवा वाहन खरेदी करू शकता. कर वगैरे सारख्या कायदेशीर बावींपासून सुटका मिळू शकते. शुभ तारखा: 28, 30

वृश्चिक – आर्थिक लाभ होतील

संघर्षानेच यशप्राप्ती होईल. धंद्यात चैतन्य आणाल. स्वभाव खर्चिक बनेल. आर्थिक लाभ होतील. विपरीत बुद्धी होईल. अचानक कोणत्याही निर्णयापर्यंत पोहोचू नका. तुमच्या या घाईगडबडीचा फायदा तुमचे विरोधक घेऊ शकतील. शांत राहून चांगले कर्म करत राहा. मांसाहार आणि मद्यसेवन टाळणे ठीक होईल. महिन्याच्या शेवटच्या आठवडयात परिस्थिती बदलायचा सुरूवात होईल. वर्षाचा शेवट सकारात्मकतेने होईल. शुभ तारखा : 25, 30

धनू – बिघडलेली कामे होतील

ग्रह तुमच्यासोबत आहेत. मोठे खर्च निघतील. नेत्रविकार जाणवेल. उत्तरार्धात नवीन कल्पना सूचतील. अधिकार मिळतील. विवाह जुळेल. बिघडलेली कामे होतील. आप्त-स्वकीयांमध्ये लग्नाचे आयोजन होऊ शकेल. वेळेचा योग्य वापर करायला शिका. प्रवेश परीक्षेची तयारी करणार्‍या विद्यार्थ्यांसाठी सोनेरी वेळ आहे. लक्ष्य निर्धारीत करून मेहनतीने ते प्राप्त करण्यासाठी झटा, यश नक्की मिळेल. शुभ तारखा: 28

मकर – दिलेले वचन जरूर पाळा

यश आपली वाट पाहत आहे, बस योग्य संधी ओळखा. थोरांचा सहवास लाभेल. लोकांकडून कौतुक होईल. आर्थिक लाभ होतील. उत्तरार्धात मोठे खर्च निघतील. नेत्रविकार जाणवेल. नैतिकता पाळा. कोर्ट-कचेरीपासून सुटका मिळेल. प्रेम-संबंध दृढ होतील. एखाद्याला दिलेले वचन जरूर पाळा. कायदेशीर अडचणींवर तोडगा मिळेल. राजनैतिक संबंधांचा फायदा होऊ शकतो. जोडीदाराचे पूर्ण साहाय्य प्राप्त होईल. शुभ तारखा: 27, 29

कुंभ – वाणीवर पूर्ण नियंत्रण ठेवा

मित्र किंवा कुटुंब खूप मदतीचे ठरतील. त्यांच्या मदतीने आपण एखाद्या मोठ्या समस्येवर तोडगा काढण्यास सक्षम असाल. एखाद्या मोठ्या व्यवसाय योजनेत पैसे गुंतविण्याबद्दल एखाद्या हितचिंतकाचा सल्ला घेणे विसरू नका. आठवड्याच्या मध्यभागी लवादाच्या मदतीने विरोधकांशी कराराची चर्चा होईल आणि वाद मिटतील. विद्यार्थी कठोर परिश्रमांवर यशस्वी होतील. कामाच्या ठिकाणी सहकार्यांसह गैरसमज उद्भवू शकतात. आपल्या वाणीवर पूर्ण नियंत्रण ठेवा. शुभ तारखा: 25, 28

मीन – आर्थिक बाजू बळकट राहील

पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे. उत्तरार्धात घरापासून दूर जावे लागेल. कायद्याची शिकार बनाल. आवश्यक ते परवाने मिळतील. घरगृहस्थीत समस्या जाणवतील. आर्थिक बाजू बळकट राहील. नव्या खरेदीसाठी ही वेळ अनुकूल आहे. नवे लाभदायक संबंध प्रस्थापित होतील. धार्मिक कार्यात रूची वाढेल. वैवाहिक जीवन कडू-गोड राहील. विध्यार्थी वर्गाला अधिक मेहनत करण्याची आवश्यकता आहे. शुभ तारखा: 22, 23

- Advertisment -

ताज्या बातम्या