ज्यो. श्री रवींद्र भगवान पाठक
मेष – खर्चावर नियंत्रण ठेवा
आपला दृढ निश्चय आणि त्याच्या पूर्तीसाठी राखलेला संयम शुभ परिणाम दाखवायला सुरुवात करील. लौकिक कीर्ती वाढेल. कल्पनेपेक्षा अधिक लाभ मिळू शकतील. मात्र खर्चावर नियंत्रण ठेवणे अत्यावश्यक आहे. कितीही दोषारोप केले गेले तरी मानसिक संतुलन ढासळू देऊ नका. हितशत्रूंच्या कारवायांना प्रदिसाद न देणेच हिताचे ठरेल.कौटुंबिक जीवनात उत्तम साथ लाभेल. भागीदाराकडून अपेक्षित सहकार्य लाभेल. आपणांवर आप्तेष्ठांकडून स्तुतीसुमने उधळली जाऊ शकतात. शुभ तारखा : 3, 6,7,8,9
वृषभ – अति विश्वास ठेवणे घातक
या आठवड्यात आपणांस अधिक जबाबदारी स्वीकारावी लागेल. प्रचलित कामकाज सुरळीतपणे चालेल. पूर्वी केलेल्या गुंतवणुकीवर अधिक लाभांश प्राप्त होऊ शकेल. अचानक वाढणारे खर्च आर्थिक ताळेबंद बिघडवू शकतात. कोणावरही अति विश्वास ठेवणे घातक ठरू शकेल. कोर्टकचेरीची कामे पुढे ढकलण्याचा प्रयत्न करा. शक्यतो कायद्याची चौकट तुटणार याची काळजी घ्या. आठवड्याच्या उत्तरार्धात मनातील संकल्पनांना मूर्त स्वरूप देण्यात यशस्वी व्हाल. तात्पुरत्या स्वरूपाच्या कामात फायदा होईल. शुभ तारखा : 3,4,5,9
मिथुन – केलेल्या प्रयत्नांना यश येईल
गेल्या काही काळापासून करीत असलेली प्रयत्नांची पराकाष्ठा फळाला येईल. भाग्योदयाच्या दिशेने वाटचाल सुरु कराल. कामकाजात उत्तम सहकार्य करणारे लोक भेटतील. परदेशातील संबंध सुधारण्यासाठी हा काळ अत्यन्त शुभ परिणाम देणारा आहे. तुम्ही केलेल्या प्रयत्नांना यश प्राप्त होईल. नोकरदारांना अत्यन्त दिलासादायक काळ आहे. आपण जर नवीन नोकरीच्या शोधात असाल तर ती नोकरी प्राप्त होईल. या राशीच्या व्यवसायिक लोकांना व्यवहार चातुर्य दाखवावे लागेल. नवीन व्यवसायाच्या संकल्पनांना गती प्राप्त होईल. शुभ तारखा : 3 ते 8
कर्क- पदोन्नतीचे योग
कामानिमित्ताने प्रवास करावा लागेल. आपण केलेल्या प्रवासाची फलश्रुती सकारात्मक फळ देणारी असेल. नोकरीमध्ये पदोन्नतीचे योग संभवतात. घर खरेदीच्या विषयावर चर्चा होईल.राजकारणात कार्यरत असाल तर आपले पद सांभाळताना तारेवरची कसरत करावी लागेल. पक्षीय पडझड सावरताना देखील तारांबळ उडू शकते. सरकार दरबारी न्यायाची अपेक्षा ठेवून त्यावर विसम्बुन राहिल्याने पश्चाताप करण्याची वेळ येऊ शकते. आर्थिक व्यवहारात फायदा होईल. ओम गं गणपतेय नमः या मंत्राचा नित्य 108 जप केल्याने मनावरील ताणतणाव कमी होण्यास मदत होईल. शुभ तारखा : 4 ते 9
सिंह – काळजीपूर्वक वाहन चालवा
उत्तम मैत्री कशी असावी याचा आदर्श स्थापित कराल. भागीदारांमध्ये निर्माण झालेली मतमतांतरे दूर होऊन सामोपचाराने पुनश्च उद्योग व्यवसाय वृद्धीसाठी एकत्र येऊ शकतील. आपण प्रकट केलेल्या विषयास सामाजिक सहकार्य प्राप्त होईल. दूरचे प्रवास टाळावेत. आपणांस जर गुडघे दुखीचा त्रास असेल तर त्याबाबत विशेष काळजी घेण्याची आवश्यकता आहे. वयोवृद्ध मंडळींनी आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये. वाहन चालवताना काळजी घ्यावी. खोल पाण्याकडे जाणे टाळावे.शुभ तारखा : 3, 6,7,8,9
कन्या – आर्थिक तरतूद करू शकाल
या आठवड्यात विविध डावपेच आखण्यात यशस्वी व्हाल. तुम्ही घेतलेल्या निर्णयाचा भविष्यात समाजमनावर मोठा प्रभाव राहील. सहजपणे आर्थिक तरतूद करू शकाल. प्राकृतिक कमजोरी निर्माण होण्याची शक्यता आहे. कौटुंबिक जीवन सुखी राहील. विवाह इच्छुकांनी सकारात्मतेने विचार करून योग्य निर्णयापर्यंत जाण्याचा प्रयत्न करावा. घरातील वातावरण मंगलमय बनेल. वयोवृद्ध मंडळींसाठी हा आठवडा दोलायमान स्थिती निर्माण करणारा आहे. नोकरदरांना उज्वल भविष्याच्या मार्गाने घेऊन जाणारा काळ आहे.शुभ तारखा: 4,5,9
तूळ – मित्रांची पुरेपूर साथ मिळेल
हा आठवडा तुमच्यासाठी नवीन गोष्टी शिकवणारा आहे. जीवनाच्या पदपथावर चालताना कायम आठवणीत राहतील अशा घटना घडतील. संततीकडून अपेक्षा पूर्ण झाल्याचा आनंद प्राप्त होईल. कर्जाऊ अथवा उचल म्हणून आर्थिक मदत मिळवण्यासाठी प्रयत्नशील असाल तर ते काम पूर्ण होईल. मित्र परिवाराच्या साथीने महत्वपूर्ण गोष्टी पूर्णत्वास नेण्यात यशस्वी व्हाल. वैवाहिक जीवनात आनंददायी घटना घडतील. आठवड्याच्या उत्तरार्धात आपणावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. शुभ तारखा: 3,6,7,8
वृश्चिक -अकारण शत्रुत्व वाढवू नका
हा आठवडा उत्तम गृहसौख्य प्रदान करणारा राहील. घर – वाहन खरेदीबाबत सकारात्मक वातावरण निर्माण होईल. शैक्षणिक दृष्टीने महत्वपूर्ण घडामोडी घडतील. आपल्या हातून धर्माला अभिप्रेत कार्य घडेल. अन्नदान केल्याने मानसिक आणि आत्मिक समाधान लाभेल. कर्ज वाढू नये यासाठी सतर्क राहावे. शब्दप्रयोग सांभाळून करा. अकारण शत्रुत्व वाढवून घेऊ नका. छोटी शस्त्रक्रिया होण्याची शक्यता आहे. रक्तदाबाच्या विकारावर इलाज करून घेणे हितकारक ठरेल. भागीदारी मध्ये फायदा होईल. शुभ तारखा : 4,5,9
धनू- समस्यांवर तोडगा निघेल
जनमानसात प्रतिमा उंचावेल. भावा बहिणीकडून अपेक्षित सहकार्य मिळेल. परीक्षेमध्ये यश संपादन कराल. परदेश गमन योग संभवतात. वैज्ञानिक संशोधन करताना आपणांकडून अलौकिक कामगिरी घडू शकते. कौटुंबिक जीवनातील समस्यांवर तोडगा निघेल. अन्नदान केल्याने मानसिक समाधान लाभेल. सामाजिक प्रतिष्ठा वाढत असताना अनेक प्रकारच्या लोकांचा विश्वास टिकवण्यासाठी कठोर परिश्रमाची आवश्यकता आहे. संतान सुखाची प्राप्ती होईल. दैवी उपासना केल्याने मनाला सामर्थ्य प्राप्त होईल. शुभ तारखा: 3,6,7,8
मकर – बदलीचे योग संभवतात
पारिवारिक स्नेह संबंध सुधारतील. परिवारातील लोकांसाठी वेळ द्यावा लागेल. शेतीविषयक कामात रस निर्माण होईल. शेतकर्यांसाठी हा काळ अत्यंत दिलासादायक आहे. डोळ्याच्या विकारां- बाबत काळजी घ्यावी. नोकरीमध्ये बदलीचे योग संभवतात. अपर पदावर कार्यरत असाल तर पदोन्नती होऊ शकते. वरिष्ठांची मर्जी संपादन करण्याचा प्रयत्न करा. भाग्योदयातील अडथळे दूर होतील. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी करीत असलेल्या प्रयत्नांना यश प्राप्त होईल. शुभ तारखा: 3,4,5,9
कुंभ – व्यवहारातील अडचणी दूर होतील
आपल्या मनातील विचारांना चालना मिळेल. नव्या संकल्पना राबविण्यासाठी संबंधित व्यवस्थापनाकडून अनमोल सहकार्य मिळेल. उत्तमप्रकारे अर्थार्जन करू शकाल. न्यायालयीन व्यवस्थापनात महत्वाची कामगिरी बजावाल. स्पर्धा परीक्षेमध्ये यश प्राप्त होईल. तीर्थ क्षेत्राच्या यात्रा निश्चित होतील. वडिलोपार्जित स्थावर मालमत्तेच्या व्यवहारातील अडचणी दूर होतील. वाहन खरेदीबाबत विचार विमर्श होतील. शुभ तारखा: 3 ते 8
मीन – स्त्रियांनी आरोग्याची काळजी घ्यावी
आपणास हा आठवडा संमिश्र प्रतिसाद असणारा राहील. सप्ताहाच्या सुरुवातीला खर्चाचे प्रमाण वाढणार आहे. परदेशातील नातेवाईकांशी सुसंवाद साधला जाईल. आरोग्यवियक चिंता दूर होईल. अनेक प्रलंबित प्रश्न मार्गी लागतील. धनसंचय करण्यास किंवा गुंतवणूक करण्यास उत्तम काळ आहे. करमणुकीची साधने उपलब्ध होतील. कलाक्षेत्रातील लोकांची कामगिरी उत्तम राहील. कान,नाक,घसा यांचे विकार उद्भवू शकतात. महिलांनी आरोग्याची विशेष काळजी घ्यावी. शुभ तारखा:-4 ते 9