Friday, November 22, 2024
Homeनगरभीमा नदीकाठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा

भीमा नदीकाठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा

खडकवासलामधून पाणी सोडले || श्रीगोंदा, कर्जत तालुक्यात अलर्ट

अहमदनगर/ श्रीगोंदा |प्रतिनिधी| Ahmednagar | Shrigonda

पुणे जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. खडकवासला व इतर धरणातून विसर्ग सुरू असून पर्जन्यमानामुळे दौंडपूल येथे भीमा नदीच्या विसर्गामध्ये वाढ होत आहे. त्यामुळे श्रीगोंदा व कर्जत तालुक्यातील भीमा नदीकाठावरील नागरिकांना अतिसतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

- Advertisement -

तसेच गोदावरी नदी पात्रामध्ये विसर्ग सुरू असून नाशिक व अहमदनगर जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे गोदावरी नदीतील विसर्गामध्ये वाढ होऊ शकते. त्यामुळे कोपरगाव, राहाता, श्रीरामपूर व नेवासा तालुक्यातील गोदावरी नदीकाठावरील गावातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नदीकाठावरील गावांनी स्थानिक प्रशासनाद्वारे देण्यात आलेल्या सुचनांचे पालन करावे. सखल भागात राहणार्‍या नागरिकांनी तातडीने सुरक्षितस्थळी स्थलांतर करावे. नदी, ओढे व नाल्याकाठच्या नागरिकांनी दक्ष रहावे, सूचना जिल्हा प्रशासनासोबत श्रीगोंदा आणि कर्जत तालुक्यातील प्रशासनाने नदी काठावरील नागरिकांना दिलेल्या आहेत.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या