Wednesday, March 26, 2025
Homeनगरभिंगारला नियमित पाणी उपलब्ध करून देणार

भिंगारला नियमित पाणी उपलब्ध करून देणार

खासदार डॉ. सुजय विखे पाटील : भिंगारच्या समस्या जाणून घेतल्या

अहमदनगर (प्रतिनिधी)- भिंगार गावचा पाणीपुरवठा नियमित व मुबलक कसा होईल, यासाठी प्रयत्न करत येथील जनतेला न्याय देऊ असे आश्वासन भाजपचे खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिले. भिंगार बँकेच्या कार्यालयात खा. विखे यांची भिंगारच्या समस्यांबाबत बैठक झाली. या बैठकीत ते बोलत होते. याप्रसंगी भिंगार बँकेचे चेअरमन गोपाळराव झोडगे यांनी तर भिंगार भाजपतर्फे महेश नामदे यांनी डॉ. विखे यांचा सन्मान केला. यावेळी झोडगे यांनी पाणी पुरवठा सुरळीतपणे व्हावा, चटईक्षेत्र निर्देशांकात वाढ करणे, कापूरवाडी तलावातील गाळ काढणे, याविषयीच्या व्यथा मांडल्या.

- Advertisement -

कॅन्टोन्मेंटचे संबंधित अधिकारी कर्मचारी पाणीप्रश्न खरी माहिती सांगत नाहीत आणि लपवाछपवी करतात. त्यांच्याकडे कोणत्याही समस्या विषयी चौकशी केली असता माहिती मिळत नाही. कर्मचारी उद्धटपणे वागतात असे सांगून बँकेचे संचालक नाथा राऊत यांनी त्यांच्या कारभाराचे वाभाडे काढले. कर्मचार्‍यांच्या बदल्या कराव्यात असे त्यांनी विखे यांना सांगितले. भाजप शाखेच्यावतीने याआधी पाणी प्रश्न सोडविण्या विषयी प्रयत्न केलेले आहेत. राज्य मंत्रालयात कॅबिनेटची बैठक घेऊन पाणीप्रश्नी काय निर्णय झाला याची माहिती महेश नामदे यांनी दिली.

चटईक्षेत्र निर्देशांकात अंकात वाढ करावी,अशी मागणी उपस्थित कार्यकर्त्यांनी केली. लोक गाव सोडून चालले आहेत, असे यावेळी त्यांच्या निदर्शनास आणून दिले. खा. विखेंनी पाणीप्रश्नाची सर्व माहिती जाणून घेतली. लष्कराच्या एमईएसचे इंजिनीयर, कॅन्टोन्मेंट बोर्डाचे अध्यक्ष व सीईओ यांची संयुक्त बैठक घेऊन गावाला करारानुसार नियमित पाणी मिळावे, यासाठी प्रयत्न करू. त्यानंतर एमआयडीसीकडून थेट कॅन्टोन्मेंटला पाणी मिळण्यासाठी प्रयत्न केले जातील, आश्वासन दिले. कापूरवाडी तलावातील गाळप्रकरणी संबंधित अधिकार्‍यांशी चर्चा करून कळवू असे ते म्हणाले. तर चटईप्रश्नी नेमक्या अडचणी काय आहेत याबाबत संरक्षण मंत्रालयाशी चर्चा करुन तो सोडवण्यासाठी प्रयत्न करु असे ते म्हणाले.

कॅन्टोन्मेंट विषयी जनतेच्या अनेक तक्रारी आहेत. त्यामुळे हॉस्पिटल, शाळा, कार्यालय व गावातील विकास कामांवर कॅन्टोन्मेंटनी मागील पाच वर्षात किती खर्च केला, याचा अहवाल सादर करण्याचे खा. विखे यांनी दिले. याप्रसंगी माजी नगरसेवक बाळासाहेब पतके, भाजपाचे रविंद्र बाकलीवाल, शामराव बोळे, अनंत रासने, निलेश साठे, अनिरुद्ध देशमुख, स्वप्नील देवतरसे, अ‍ॅड. अक्षय भांड, नागरदेवळे ग्रामपंचायत सदस्य महेश झोडगे आदींसह भाजप कार्यकर्ते व भिंगार बँक संचालक उपस्थित होते.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Rahuri : राहुरीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना

0
राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuri राहुरी (Rahuri) शहरातील श्री बुवासिंद बाबा तालीम येथे आज (बुधवार) दुपारच्या सुमारास अज्ञात इसमाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना (Chhatrapati Shivaji...