Friday, May 3, 2024
Homeनगरभिंगारकरांचा पाण्यासाठी छावणी परिषदेवर मोर्चा

भिंगारकरांचा पाण्यासाठी छावणी परिषदेवर मोर्चा

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

भिंगार शहरात छावणी परिषद हद्दीत 11 दिवसांपासून पाणी न सुटल्याने नागरिकांनी छावणी परिषदेवर मोर्चा काढला.

- Advertisement -

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहर संघटक मतीन सय्यद यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या मोर्चात रिकामे हांडे घेऊन महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. आंदोलकांनी सर्व नगरसेवक व छावणी परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे प्रतिकात्मक दगड ठेऊन त्याची पूजा केली व लवकरात लवकर पिण्यासाठी दररोज पाणी मिळण्यासाठी साकडे घालण्यात आले.

या मोर्चात संभाजी भिंगारदिवे, सामाजिक न्याय विभागाचे सिद्धार्थ आढाव, ईश्वर भंडारी, इब्राहिम चौधरी, निसार शेख, आसिफ शेख, मदिना शेख, नुरजहॉ शेख, गुलनाज सय्यद, अनुराधा भंडारी, शोभा भंडारी, ज्योती देवतरसे, सुशीला देवतरसे, राणी विधाते, कुसुम वागस्कर, नलिनी भिंगारदिवे, सुंदर भिंगारदिवे, सरिता पंडित, रोहिणी पंडित, नासिर शेख, अंजुम सय्यद, सलमान शेख, स्वप्निल पवार, हाजी आरिफ, अन्सार सय्यद, जाफर शेख आदींसह नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

भिंगार येथील छावणी हद्दीत सुमारे 11 दिवसांपासून नळाला पाणी आलेले नाही. येथील नागरिक पिण्याच्या पाण्यासाठी वनवन फिरत आहेत. मोठ्या प्रमाणात येथील नागरिकांचे हाल होत असून या ठिकाणी पाण्याचे टँकर येत असले तरी हे टँकरमधून मोजक्या लोकांनाच पाणी वाटप केले जात आहे. प्रभागातील नगसेवक सांगेल तेथेच पाणी वाटप होत आहे.

प्रभाग चार मधील बोअरवेल नादुरुस्त असल्याने, कॅन्टोन्मेंटचे पाणी नाहीच तर बोअरवेलचे पाणी मिळणे देखील अवघड झाले आहे. स्थानिक नागरिकांसह महिलांचे पाण्यासाठी मोठे हाल होत आहे. छावणी परिषदेच्या अधिकार्यांशी संपर्क साधला असता पैसे नाही, टेंडर झालेले नाही असे उडवाउडवीचे उत्तरे दिले जात असल्याचा आरोप आंदोलकांनी केला.

भिंगार शहरातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न येत्या 6 दिवसात न सोडविल्यास मंगळवार (दि.22) ला तीव्र आंदोलन करुन भिंगार बंद ठेवण्याचा इशारा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहर संघटक सय्यद यांनी दिला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या