Wednesday, January 7, 2026
HomeनगरLeopard Attack : बिबट्याच्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी

Leopard Attack : बिबट्याच्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी

परिसरातील तिसरी घटना

भोकर |वार्ताहर| Bhokar

श्रीरामपूर (Shrirampur) तालुक्यातील भोकर (Bhokar) येथे एका 55 वर्षीय जेष्ठ महिलेवर बिबट्याने मध्यरात्री झडप (Leopard Attack) घालून महिलेला गंभीर जखमी (Injured) केले. या हल्ल्यात महिलेच्या हाताला, पायाला व तोंडाला जखमा झाल्या. केवळ दैव बलवत्तर म्हणून महिलेचा ओरडा ऐकून लगतच्या तरुणांनी धाव घेत या बिबट्याला हुसकावल्याने ही महिला बचावली व पुढील अनर्थ टळला. जखमी महिलेवर अहिल्यानगर (Ahilyanagar) येथील शासकीय रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

- Advertisement -
YouTube video player

भोकर (Bhokar) शिवारातील हनुमाणवाडी परीसरात गट नं. 381 मध्ये वस्ती करून राहत असलेल्या पुष्पा भाऊसाहेब पवार या आपली बहीण इंदुबाई माधव कोतवाळ यांच्या समवेत घरात झोपलेल्या असताना मंगळवार, 10 जूनच्या मध्यरात्री नेहमीप्रमाणे पुष्पा पवार या लघुशंकेसाठी बाहेर आल्या असता अचानक त्यांच्यावर बिबट्याने झडप (Leopard Attack) घातली. अचानक झालेल्या हल्ल्याने पुष्पा यांनी आरडा ओरडा केला. त्यांचा आवाज ऐकून जवळच्या घरातील धनंजय भोईटे व शेजारच्या वस्तीवरील अमोल कांबळे हे मदतीला धावले आणि दोघांच्या ओरड्याने बिबट्याने पुष्पा यांना सोडून पळ काढला. परंतु या हल्ल्यात पुष्पा पवार गंभीर जखमी (Injured) झाल्या. केवळ दैव बलवत्तर म्हणून ही महिला बिबट्याच्या तावडीतून बचावली आणि पुढील मोठा अनर्थ टळला. त्यांना पुढील उपचारासाठी अहिल्यानगर येथील शासकीय रूग्णालयात दाखल केले आहे.

ही घटना घडल्याचे समजताच कोपरगाव (Kopargav) येथील वनसंरक्षक रोडे, वनपाल विठ्ठल सानप यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक अक्षय बडे व विलास डगळे यांनी घटनास्थळी भेट दिली. भोकर परीसरात बिबट्याच्या हल्ल्यात (Leopard Attack)  जखमी होणारी ही तिसरी व्यक्ती असून बिबट्याच्या बंदोबस्तासाठी वनविभाग (Forest Department) पिंजरा (Cage) देत असला तरी या पिंजर्यात भक्ष्य कोण ठेवणार, हा प्रश्न निर्माण झाला आहे.

ताज्या बातम्या

पडसाद : कांदा उत्पादकांची परवड सुरुच !

0
शेतकर्‍यांविषयी सर्वच राजकीय पक्षांना पुळका येत असतो, यात आता तसे काही नाविन्य राहिलेले नाही. प्रत्येकजण आम्हीच कसे शेतकरी हितकर्ते असा आव आणतात, हे देखील...