Friday, May 3, 2024
Homeनाशिकलासलगाव बाजार समितीच्या 'या' खरेदी-विक्री केंद्रावर १४ तारखेपासून भुसार व तेलबिया लिलावास सुरूवात 

लासलगाव बाजार समितीच्या ‘या’ खरेदी-विक्री केंद्रावर १४ तारखेपासून भुसार व तेलबिया लिलावास सुरूवात 

शिरवाडे वाकद | प्रतिनिधी | Shirwade wakad

लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (lasalgaon Apmc) मानोरी खु. फाटा येथे दिपावली पाडव्याच्या शुभमुहूर्तावर मंगळवार (दि.१४ नोव्हेंबर) पासून भुसार व तेलबिया (Bhusar and oilseeds) शेतीमाल लिलावास सुरूवात होणार असल्याची माहिती बाजार समितीचे सभापती बाळासाहेब क्षीरसागर (Balasaheb Kshirsagar) यांनी दिली आहे….

- Advertisement -

निफाड तालुक्यातील मौजे मानोरी खु, देवगांव, शिरवाडे वाकद, कानळद, खेडलेझुंगे, कोळगांव, भरवस, वाहेगांव, गोंदेगांव, गोळेगांव या गावांसह येवला, सिन्नर, कोपरगाव या तालुक्यातील शेतकरी बांधवांना त्यांचा भुसार व तेलबिया शेतीमाल विक्री करणे सोईचे व्हावे यासाठी बाजार समितीने मौजे मानोरी खु. येथे तात्पुरते खरेदी-विक्री केंद्र स्थापन केले असून सदर केंद्रावर दिपावली पाडव्याच्या शुभमुहूर्तावर भुसार व तेलबिया या शेतीमालाचे लिलाव (Auction) सुरू होणार आहेत.मानोरी खु.फाट्यावर बाजार समिती खरेदी केंद्र व्हावे यासाठी संचालक डॉ.श्रीकांत आवारे प्रयत्नशील होते.

Nashik News : फुलांच्या खरेदीसाठी नाशिककरांची गर्दी; झेंडूचा भाव वाढला

सदर खरेदी-विक्री केंद्रावर शेतकरी बांधवांनी त्यांचा भुसार व तेलबिया हा शेतीमाल विक्रीसाठी आणल्यानंतर बाजार समितीच्या नियमाप्रमाणे सदर शेतीमालाचा जाहीर लिलाव होणार असून लिलावानंतर इलेक्ट्रॉनिक (Electronic) काट्यावर चोख वजनमाप व त्यानंतर लगेचच रोख चुकवती देण्यात येणार आहे.भुसार आणि तेलबिया शेतीमाल खरेदीस इच्छुक असणाऱ्या व्यापाऱ्यांनी लायसेन्सबाबतच्या सर्व अटी पूर्ण केल्यास त्यांना तात्काळ परवाना देण्यात येणार असल्याचे सभापती क्षीरसागर यांनी सांगितले.

दरम्यान, शेतकरी बांधवांनी त्यांचा भुसार व तेलबिया शेतीमाल मंगळवार (दि.१४) बाजार समितीच्या मानोरी खु. (फाटा) येथील तात्पुरत्या खरेदी-विक्री केंद्रावर विक्रीसाठी आणावा असे आवाहन बाजार समितीचे सभापती बाळासाहेब क्षीरसागर, उपसभापती गणेश डोमाडे, सचिव नरेंद्र वाढवणे यांच्यासह सर्व सदस्य मंडळाने केले आहे.

‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Nashik Crime News : स्कूटरच्या डिक्कीतून ‘इतक्या’ लाखांची रोकड लंपास

- Advertisment -

ताज्या बातम्या