Friday, May 3, 2024
Homeजळगावजिवे ठार मारण्याच्या प्रयत्न करणारा ताब्यात

जिवे ठार मारण्याच्या प्रयत्न करणारा ताब्यात

भुसावळ (प्रतिनिधी) bhusawal-

बाजारपेठ पोलिसा ठाण्यात दाखल गु.र.नं. ९१६/२०२०, भां.द.वि. ३०७, ५०६, ३४ प्रमाणे दि. २७ ऑक्टोबर रोजी दाखल गुन्हयातील आरोपीस बाजारपेठ पोलिसांच्या शोध पथकाने ताब्यात घेतले.

- Advertisement -

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार अजय गिरधारी गोडाले (वय-२७, रा.भुसावळ) यांना दि. २६ ऑक्टोंबर रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास आरोपींनी मागील भांडणाच्या कारवारुन आरोपीच्या नवीन बांधकाम असलेल्या घराच्या गच्चीवरून खाली फेकून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला होता.

याबाबत दि. ८ रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास यातील संशयित आरोपी देवेन्द्र उर्फ बापू विनोद जावरे (वय-३१) हा शहरातील गडकरी नगरात असल्याच्या गुप्त माहितीच्या आधारे डिवायएसपी सोमनाथ वाघचौरे, पो.नि दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि अनिल मोरे, मंगेश गोटला, सहा.फौज. तस्लिम पठाण, पो.ना. रविंद्र बिर्‍हाडे, रमण सुरळकर, समाधान पाटील, उमाकांत पाटील, तुषार पाटील, पो.कां. विकास सातदिवे, ईश्वर भालेराव, प्रशांत परदेशी, कृष्णा देशमुख, चेतन ढाकणे, योगेश महाजन, दिनेश कापडणे, सुभाष साबळे, सचिन चौधरी, होमगार्ड श्री. सुरळकर यांनी केली.

तपास सपोनि अनिल मोरे व पो.ना. समाधान पाटील करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या