Friday, May 3, 2024
Homeराजकीयभुसावळात 646 तर यावलमध्ये 907 उमेदवार रिंगणात

भुसावळात 646 तर यावलमध्ये 907 उमेदवार रिंगणात

भुसावळ – Bhusawal – प्रतिनिधी :

भुसावळ तालुक्यातील 26 तर, यावल तालुक्यातील 47 ग्रा.पं. साठी होऊ घातलेल्या निवडणुकतीत भुसावळ तालुक्यातील 198 जणांनी माघार घेतल्याने दोन ग्रामपंचायतींसह 56 जणांची बिनविरोध निवड झाली तर यावल तालुक्यात 225 जणांनी माघार घेतल्यामुळे 90 जागा बिनविरोध झाल्या तर 907 जण रिंगणात आहे.

- Advertisement -

भुसावळ –

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी माघारीच्या शेवटच्या दिवशी संपूर्ण तालुक्यात 56 ग्रामपंचायत सदस्यांची बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकार्‍यांनी जाहीर केले.

तालुक्यातील 26 ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक प्रक्रिया सुरू झाली यासाठी 15 डिसेंबरला मतदान प्रक्रिया घेतली जाणार आहे यासाठी दि. 4 रोजी माघारीच्या शेवटच्या दिवशी अनेक इच्छुक उमेदवारांनी माघार घेतल्याने तालुक्यातील 26 ग्रामपंचायतीमधील 56 सदस्य हे बिनविरोध निवडून आले आहेत. त्यात तालुक्यातील शिंदी व कठोरे बु. या दोन ग्रा.पं.ची बिनविरोध निवड झाली.

तालुक्यातील शिंदी येथे 3 जणांनी माघार घेतल्याने संपूर्ण 9 सदस्य तर कठोरे बु. येथे संपूर्ण 7 सदस्य बिनविरोध झाल्यामुळे या ग्रा.पं. ची बिनविरोध निवड झाली. या शिवाय तालुक्यातील , मांडवेदिगर येथे 2 प्रभागातून 7 सदस्य, पिंपळगाव बुद्रुक 1 प्रभागातून 5 सदस्य, बोहर्डी बु. 1 प्रभागातून 3 सदस्य, खडके येथे 1 प्रभागातून 3 सदस्य, कठोरा खुर्द 1 प्रभागातून 2 सदस्य, मान्यरखेडे 1 प्रभागातून 4 सदस्य, काहूरखेडे 2, जाडगाव 1, कुर्हे प्र. न. 2, दर्यापूर 2, जोगलखेडे 1, बेलव्हाय 2, खंडाळे 1, साकरी 2 असे एकूण 56 सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत.

यावल –

तालुक्यात 47 ग्रा.पं, च्या निवडणुका होऊ घातल्या आहे. या निवडणुकतील 225 जणांनी माघार घेतल्यामुळे 90 जणांची बिनविरोध निवड करण्यात आली. तालुक्यातील 1219 जणांचे अर्ज वैध होते. त्यापैकी 225 जणांनी माघार घेतल्यामुळे 47 ग्रा.पं. च्या 469 जागांसाठी तब्बल 907 उमेदवार निवडणुक रिंगणात आहे.मारुळ येथे दहा जागा बिनविरोध. माघार घेणार्‍या उमेदवारांमध्ये गाव निहाय उमेदवार असे

पिंप्री 4, बोरखेडा बु 4, वढोदे प्र. यावल 6, किनगाव बुद्रुक 4, निमगाव 1, नायगाव 1, अंजाळे 3, महेलखेडी 1, आडगाव 9, सांगवी बुद्रुक 5, पिळोदे 1, उंटावद 2, पिंपरूळ 3, आमोदा 6, वनोली 2, कोसगाव 1, बोरावल खुर्द2, मोहराळा 4, दुसखेडा 1, वढोदा प्र. सावदा 1, कोरपावली 1, मारूळ 9, विरोदा 1, कोळवद 1, कासवे 3, टाकरखेडा 6, नावरे 5, अट्रावल 2, हंबर्डी 1 असे 90 उमेदवार बिनविरोध झाले आहे.

तालुक्यातील टाकरखेडा ग्रामपंचायतीच्या सहा ग्रामपंचायत सदस्यांच्या जागा बिनविरोध झाली असून वार्ड 1 मधील ओबीसी महिला एकमेव जागेसाठी कल्पना संतोष चौधरी व लताबाई दयाराम चौधरी यांच्यामध्ये सरळ लढत होत आहे. बिनविरोध झालेल्या जागा वार्ड एक अनिल आत्माराम महाजन, रत्ना राजेंद्र चौधरी. वॉर्ड 2 मालतीबाई खापरू, पाटील आशाबाई, संजय चौधरी. वार्ड 3 समाधान वसंत पाटील, बेबीबाई नथ्थु चौधरी हे बिनविरोध झाले आहे. बिनविरोध काढण्यासाठी जितेंद्र चौधरी यांनी परिश्रम घेतले. तर नावरे ग्रामपंचायतीच्या पाच जागा बिनविरोध झाल्या तर दोन जागांसाठी सरळ चार उमेदवार रिंगणात आहेत. त्यात वार्ड 1 मध्ये उज्वला पाटील तर विद्यमान सरपंच समाधान पाटील(वॉर्ड 3) चंद्रभागा मुरलीधर पाटील(वार्ड 3),प्रतिभा संदीप पाटील(वार्ड 2) ,दयाराम दौलत पाटील वार्ड 2 मधुन बिनविरोध निवडून आले आहेत. एस्सी जागेसाठी रवींद्र सुपडू मेढे व अंबादास अर्चन सोनवणे, रेखा उत्तम मिळे व सीमा प्रवीण सोनवणे हे निवडणूक रिंगणात असून याठिकाणी दोन जागा निवडा वायचे आहे.

मनवेल यावल ग्रुप ग्रामपंचायतीच्या वार्ड क्र 3 मधून अलका छगन पाटील बिनविरोध निवडून आल्यात. वडोदा प्र वार्ड 1 मध्ये एका जागेसाठी सरळ लढत होत असून त्यात संदीप प्रभाकर सोनवणे व जितेंद्र लालचंद्र सोनवणे यांच्यात मुकाबला आहे तर बिनविरोध झालेल्यांमध्ये वार्ड 1 रूपाली चेतन सोनवणे, संगीता चिंतामण भिल, वार्ड 2 गोपाळ बुधो चौधरी, प्रतिभा धनराज सोनवणे, वॉर्ड 3 किरण प्रताप सोनवणे, मायाबाई गोविंदा सोनवणे या सहा जागा जि. प. गटनेते प्रभाकर सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली बिनविरोध झाल्या आहेत. यावल तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या वॉर्ड 2 मधून सुनंदा गोपाळ महाजन या बिनविरोध निवडून आल्या.

मारुळ येथे 10 बिनविरोध- मारूळ येथील अनेक ग्रामस्थांच्या सहकार्याने 17 जागांसाठी च्या होणार्‍या निवडणूकीत 10 जागा बिनविरोध झाल्याने ग्रामस्थांमध्ये आनंद व्यक्त होत आहे. 17 जागांसाठी 30 अर्ज भरण्यात आले होते.

मात्र माघारीच्या अंतिम दिवशी वार्ड 5 व वार्ड 6 मध्ये काही अर्ज माघारी घेण्यात आले नाही तर वार्ड न 1,2,6 असे तीन वार्ड बिनविरोध झाले आहे. मारुळ गावात एकूण सहा वार्ड मधून (3) वर्ड बिनविरोध झालेले आहे तसेच वॉर्ड पाच मध्ये एक, वार्ड 1 मध्ये असद अहमद जावेद अली (सय्यद) सलामत अली (सय्यद) सिताराम पाटील तसेच वार्ड 2 मध्ये रफत अली (सय्यद) तोफिक शेख चांद, वार्ड 6 मध्ये शफी का बेगम युनुस अली (सय्यद) मुर्तजा अली (सय्यद) एकनाथ पाटील हे सर्व बिनविरोध आल्याने गावात आनंद व्यक्त होत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या