जळगाव । देवदर्शनासाठी गेलेल्या जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील भाविकांच्या बसला नेपाळमध्ये भीषण अपघात झाला आहे. बस थेट नदीत कोसळल्याने १४ जणांचा मृत्यू झाला. तर १७ जणांना वाचवण्यात यश आल्याचे वृत्त हाती येत आहे. यातील काही भावीक बेपत्ता असल्याचे सुद्धा समजते मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे
भुसावळ तालुक्यातील वरणगाव, पिंपळगाव आणि तळवेल परिसरातील भाविक देव दर्शन करण्यासाठी गेले होते. ११० जणांचे हे ग्रुप होते. भाविक प्रयागराजपर्यंत ट्रेनने गेल्यानंतर तेथून त्यांनी गोरखपूरच्या केसरवाणी टूर अॅण्ड ट्रॅव्हल्स एजन्सीच्या बस बुक केल्या होत्या. १६ ते २८ ऑगस्टपर्यंत त्यांचा प्रवास ठरला होता.
बसचा क्रमांक (युपी53 एफ.टी.7623) ही भाविकांना घेवून पोखराकडून काठमांडूकडे जात असताना चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने बस थेट नदीत कोसळली. या अपघातात १४ भाविकांचा मृत्यू झाला. तर १७ जणांना वाचवण्यात यश आले. दरम्यान, यातील काही भावीक बेपत्ता असल्याचे सुद्धा समजते असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. बस जिथे पडली ते ठिकाण डोंगराच्या खाली असल्याने बचावकार्यात अडचणी आल्या.
स्थानिक पोलीस आणि आपत्कालीन विभागाचे कर्मचारी प्रवाशांना रेस्क्यू करत आहेत. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यासाठी पाठवलं जात आहे. प्रवाशांची यादी समोर आली आहे.
अनंत ओंकार इंगळे
सीमा अनंत इंगळे
सुहास राणे
सरला राणे
चंदना सुहास राणे
सुनील जगन्नाथ धांडे
निलीमा सुनील धांडे
तुळशीराम बुधो तायडे
सरला तुळशीराम तायडे
आशा समाधान बावस्कार
रेखा प्रकाश सुरवाडे
प्रकाश नथु सुरवाडे
मंगला विलास राणे
सुधाकर बळीराम जावळे
रोहिणी सुधाकर जावळे
विजया कडू जावळे
सागर कडू जावळे
भारती प्रकाश जावळे
संदीप राजाराम सरोदे
पल्लवी संदीप सरोदे
गोकरणी संदीप सरोदे
हेमराज राजाराम सरोदे
रुपाली हेमराज सरोदे
अनुप हेमराज सरोदे
गणेश पांडुरंग भारंबे
सुलभा पांडुरंग भारंबे
मिलन गणेश भारंबे
परी गणेश भारंबे
शारदा सुनील पाटील
कुमुदिनी रविंद्र झांबरे
शारदा सुनील पाटील
निलीमा चंद्रकांत जावळे
ज्ञानेश्वर नामदेव बोंडे
आशा ज्ञानेश्वर बोंडे
आशा पांडुरंग पाटील
प्रवीण पांडुरंग पाटील
सरोज मनोज भिरुड
पंकज भागवत भगाळे
वर्षा पंकज भंगाळे
अविनाश भागवत पाटील
अनिता अविनाश पाटील
मुर्तीजा (ड्रायव्हर)
रामजीत (वाहक)