Sunday, April 13, 2025
Homeब्रेकिंग न्यूजBhushan Gavai : महाराष्ट्राचे भूषण गवई होणार सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश; 'या'...

Bhushan Gavai : महाराष्ट्राचे भूषण गवई होणार सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश; ‘या’ तारखेला घेणार शपथ

नवी दिल्ली | New Delhi | वृत्तसंस्था

देशाचे विद्यमान सरन्यायाधीश संजीव खन्ना (Sanjeev Khanna) हे लवकरच निवृत्त होणार आहेत. त्यामुळे पुढील सरन्यायाधीश (Chief Justice) कोण होणार याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून होते. अखेर या चर्चेला पूर्णविराम मिळाला असून, देशाच्याा सरन्यायाधीशपदी महाराष्ट्रातील (Maharashtra) पुत्र विराजमान होणार आहे.

- Advertisement -

महाराष्ट्रातील प्रसिद्ध विधिज्ञ आणि आंबेडकरी चळवळीचा वारसा लाभलेले आणि सर्वोच्च न्यायालयाचे ज्येष्ठ न्यायमूर्ती भूषण गवई (Bhushan Gavai) हे देशाचे ५२ वे सरन्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारणार आहेत. ते १४ मे रोजी सरन्यायाधीशपदाची शपथ घेणार असून, राष्ट्रपती द्रोपती मुर्मू (Draupadi Murmu) या भूषण गवई यांना सरन्यायाधीशपदाची शपथ देतील, अशी माहिती आहे. भूषण गवई हे भारतीय रिपब्लिकन पक्षाचे दिवंगत नेते, माजी आमदार, खासदास आणि बिहार, सिक्कीम व केरळ राज्यांचे राज्यपाल राहिलेल्या रा.सु. गवई आणि कमलाताई गवई यांचे पुत्र आहेत.

न्यायमूर्ती भूषण गवई यांचा जन्म अमरावती जिल्ह्यात (Amravati District) २४ नोव्हेंबर १९६० रोजी झाला. मुंबईतून कायद्याची पदवी घेतल्यानंतर त्यांनी १९८५ मध्ये वकिलीला सुरुवात केली. काही काळ त्यांनी मुंबई आणि अमरावतीमध्ये काम केले. यानंतर त्यांनी उच्च न्यायालयाचे (High Court) न्यायमूर्ती दिवंगत बारिस्टर राजा एस. भोसले यांच्यासोबत काम केले. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात ते न्यायाधीश झाले. त्यानंतर काही वर्षांनी त्यांना बढती मिळाली. गवई यांनी नागपूर (Nagpur) बार असोसिएशनचे सदस्य म्हणून काम पाहिले होते. यापूर्वी न्यायमूर्ती मोहम्मद हिदायतुल्ला आणि शरद बोबडे सरन्यायाधीश झाले आहेत.

सहा महिन्यांचा मिळणार कालावधी

२०१९ साली भूषण गवई यांची सर्वोच्च न्यायालयासाठी शिफारस करण्यात आली होती. यानंतर न्यायाधीश म्हणून त्यांनी २४ मे २०१९ रोजी शपथ घेतली. त्यावेळेस त्यांनी अनेक महत्वाचे निर्णय दिले होते. आता त्यांची सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या सरन्यायाधीशपदाचा कार्यकाळ १४ मे २०२५ ते २३ नोव्हेंबर २०२५ पर्यंत असणार आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Sanjay Raut : “अमित शाहांकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान, आता फडणवीस...

0
मुंबई | Mumbai छत्रपती शिवाजी महाराजांची ३४५ वी पुण्यतिथी व शिवरायांच्या समाधीच्या जिर्णोद्धारास १०० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत काल...