Thursday, January 8, 2026
Homeब्रेकिंग न्यूजBhushansingh Raje Holkar : "... तर आम्ही सहन करणार नाही"; वाघ्या कुत्र्याच्या...

Bhushansingh Raje Holkar : “… तर आम्ही सहन करणार नाही”; वाघ्या कुत्र्याच्या स्मारकावरून भूषणसिंह राजे होळकरांचा इशारा

पुणे | Pune

वाघ्या कुत्र्याच्या रायगड किल्ल्यावरील स्मारकावरून सध्या राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मुख्यमंत्र्यांना (CM) पत्र (Letter) पाठवून ‘वाघ्या कुत्र्याच्या अस्तित्वाबाबत कोणतेही ठोस असे ऐतिहासिक पुरावे नसल्याने ते स्मारक तिथून हलवावे’, अशी मागणी केली आहे. त्यामुळे राज्यात नवा वाद निर्माण झाला आहे. आता या पार्श्वभूमीवर होळकरांचे वंशज भूषणसिंह राजे होळकर (Bhushansingh Raje Holkar) यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ते पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

- Advertisement -

यावेळी ते म्हणाले की, “औरंगजेबाच्या समाधीचा विषय झाला. आता रायगडावरील वाघ्या कुत्र्याचा विषय समोर आणला गेला आहे. रायगड किल्ल्यावर असलेल्या वाघ्या कुत्र्‍याचा विषय हा कोणत्या एका जातीचा किंवा समाजाचा नाही. वाघ्या कुत्र्‍याच्या इतिहासाबाबत (History) अभ्यासक बोलतील. याबाबत संभाजी राजेंनी भूमिका घेतली आहे. मात्र वाघ्याची अडचण आहे की, होळकरांनी निधी दिला याची अडचण आहे? हे समजत नाही”, असे भूषणसिंह राजे होळकरांनी म्हटले.

YouTube video player

पुढे ते म्हणाले की,”रायगडावरील वाघ्या कुत्र्याचे स्मारक (Waghya Dog Statue) हा विषय एका समाजाचा नाही. मात्र, महाराष्ट्रात प्रत्येक विषयाला जातीय रंग दिला जात आहे. होळकरांनी स्वतःच्या कुत्र्याची समाधी रायगडावर का बांधली असती. या सगळ्या गोष्टी कथा आहेत. या स्मारकाचा मुद्दा हा कोणीही जातीय अस्मितेचा मुद्दा करू नये. काही संघटना तो पुतळा पाडू, तो पुतळा काढून टाकू, अशी भूमिका घेत आहेत. मात्र अशा आतताईपणाची भूमिका कोणत्याही संघटनेने घेऊ नये, ते आम्ही सहन करणार नाही”, असेही होळकर यांनी म्हटले.

तसेच “काल एका पत्रकार परिषदेत (Press Conference) म्हटले गेले की होळकर इंग्रजांना घाबरत होते. मात्र, इंग्रजांबरोबर कधी होळकरांनी सेटलमेंट केली नाही. होळकरांनी सर्व समाजासाठी काम केले. होळकर शेवटपर्यंत इंग्रजांसोबत लढले. होळकर कधीही इंग्रजांसमोर झुकले नाहीत. होळकर इंग्रजांना (British) घाबरत होते, हे वक्तव्य करणाऱ्यांना इतिहासाची माहिती नाही. त्यामुळे चुकीचे वक्तव्य खपवून घेतले जाणार नाहीत”, असा इशाराही यावेळी भूषणसिंह राजे होळकर यांनी दिला.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : रिव्हॉल्वर हलगर्जीपणे हाताळल्याचा ठपका; दोन पोलीस अंमलदार निलंबित

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar अहिल्यानगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांना सुरक्षा देणारे दोन पोलीस बॉडीगार्ड कर्तव्यात कसूर व शस्त्र हाताळण्यात हलगर्जीपणा केल्याप्रकरणी निलंबित करण्यात आले आहेत....