Friday, May 3, 2024
Homeनगरएका बिबट्याचा राहुरीत फेरफटका; दुसर्‍याचा माळवाडगावात मुक्काम

एका बिबट्याचा राहुरीत फेरफटका; दुसर्‍याचा माळवाडगावात मुक्काम

राहुरी (प्रतिनिधी) – राहुरी शहरात भरवस्तीमध्ये दि. 13 फेब्रुवारीच्या मध्यरात्री बिबट्याने मुक्त संचार केल्याचे एका सीसीटीव्ही कॅमेर्‍यात दिसल्याने नागरिक भयभीत झाले असून या बिबट्याचा त्वरीत बंदोबस्त करावा, अशी मागणी शहरातील नागरिक करीत आहेत. या घटनेमुळे शहरातील नागरिकांध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.  

राहुरी शहरातील डूबीचा मळा परिसरातील राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र बोरकर यांच्या घराजवळ दि. 13 फेब्रुवारी रोजी पहाटे चार वाजे दरम्यान एक बिबट्या मुक्त संचार करत असल्याचे मंदाताई साठे यांच्या घरासमोरील सीसीटीव्हीत दिसून आला. यावेळी परिसरातील मोकाट कुत्रे जोरजोरात भुंकत होते. कुत्र्यांचा आवाज ऐकून मंदाताई साठे या घराबाहेर आल्या. यावेळी त्यांना काही अंतरावर बिबट्या दिसला. क्षणाचाही विलंब न करता त्या घरात गेल्या आणि दरवाजा बंद करून घेतला. घाबरलेल्या अवस्थेत त्यांनी राजेंद्र बोरकर यांना फोन करून बिबट्याची माहिती दिली. बोरकर यांनी काही मित्रांना बरोबर घेऊन परिसरात पाहणी केली. मात्र, बिबट्या दिसून आला नाही. यावेळी बोरकर यांनी मंदाताई साठे यांच्या घरा समोरील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता त्यात बिबट्या दिसून आला. या घटनेने नागरिकांत घबराटीचे वातावरण पसरले आहे. बिबट्याचा मानवी वस्तीत वावर दिसल्याने नागरिकांनी चिंता व्यक्त करत बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे.

- Advertisement -

शहरात भर वस्तीतील बिबट्याचा वावर हा चर्चेचा विषय झाला असून नागरिकांमधे घबराट पसरली आहे. वन्यप्राणी जंगल सोडून मानवी वस्तीत शिरल्याने वन खात्याने तातडीने येथे पिंजरा बसवत बिबट्याचा शोध घेवून नागरिकांना भयमुक्त करत बिबट्याला जेरबंद करावे अशी मागणी परिसरातील जनतेने केली आहे. बिबट्या दिसल्याने अबालवृध्द बाहेर निघण्यास घाबरत आहेत. राजेंद्र बोरकर, जावेद आतार, दिनेश कल्हापुरे, पप्पू कोरडे, शिवाजी काकुळदे, अन्वर आतार, अंकुश कोरडे, सागर खरात यांनी वन विभाग अधिकार्‍यांची भेट घेऊन घटनेची माहिती दिली. या ठिकाणी पिंजरा लावून बिबट्याचा त्वरीत बंदोबस्त करावा, अशी मागणी केली आहे.

मंत्र्यांच्या वाड्यावर आमची यंत्रणा गुंतलेली आहे ; वन खात्याचे उत्तर
आज सकाळी बाहेर पडलेला बिबट्या उसाच्या फडात पुन्हा शिरल्यानंतर तीन आठवडे पासूनचा त्रास कमी करण्यासाठी शेतकर्‍यांनी वन कर्मचारी अधिकारी यांना मदत करण्याचे ठरविले. दिवसभर चोहोबाजूंनी उसाला पहारा दिला.कुणीही फिरकत नसल्याने पुन्हा पवार नावाचे वनविभागाचे कर्मचार्‍यांशी संपर्क साधला असता आम्ही सर्व कर्मचारी अधिकारी राहुरी येथे मंत्रीमहोदयांच्या वाड्यावर बिबट्या पकडण्यासाठी व्यस्त असल्याचे सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या