Sunday, November 24, 2024
Homeक्रीडामोठा निर्णय ! विम्बल्डनच्या खेळाडूंना मिळणार बक्षीस रक्कम!

मोठा निर्णय ! विम्बल्डनच्या खेळाडूंना मिळणार बक्षीस रक्कम!

विम्बल्डन – Wimbledon

कोरोनाच्या उद्रेकामुळे यंदाची ग्रॅंडस्लॅम विम्बल्डन रद्द करण्यात आली आहे. परंतु विम्बल्डनच्या ६२० खेळाडूंना बक्षीस रक्कम मिळणार आहे. १२.५ मिलियन डॉलर्स इतक्या बक्षीसाचे वितरण या खेळाडूंमध्ये करण्यात येणार आहे. विमा कंपनीशी सल्लामसलत केल्यानंतर क्लब अधिकार्‍यांनी सांगितले, की मुख्य ड्रॉमध्ये भाग घेत असलेल्या २५६ खेळाडूंना प्रत्येकी ३१,००० डॉलर्सची रक्कम दिली जाईल.

- Advertisement -

ऑॅल इंग्लंड क्लबने ही घोषणा केली आहे. पात्रतेमध्ये भाग घेतलेल्या २२४ खेळाडूंना प्रत्येकी १५, ६०० डॉलर्सची रक्कम दिली जाणार आहे. ऑॅल इंग्लंड क्लबचे मुख्य कार्यकारी रिचर्ड लुईस म्हणाले, ’’चॅम्पियनशिप रद्द झाल्यानंतर विम्बल्डन आयोजित करणार्‍यांच्या मदतीसाठी आम्ही पुढाकार घेतला आहे.’’

दुहेरी स्पर्धेत भाग घेणार्‍या १२० खेळाडूंना प्रत्येकी ७८०० डॉलर्स, व्हीलचेयर स्पर्धेत भाग घेणार्‍या १६ खेळाडूंना ७५०० डॉलर्स आणि (चार खेळाडूंच्या) व्हीलचेयर स्पर्धेत भाग घेणार्‍या चार खेळाडूंना ६, २०० डॉलर्स दिले जातील.

सर्वजण विम्बल्डनच्या या निर्णयाचे कौतुक करत आहेत. टेनिस चाहत्यांनी याला ऐतिहासिक निर्णय असेही म्हटले आहे. यंदाची विम्बल्डन स्पर्धा २९ ते १२ जुलैमध्ये काळात खेळवण्यात येणार होती. पण कोरोनामुळे ही स्पर्धा रद्द करण्याचा निर्णय आयोजकांनी घेतला. या स्पर्धेचा पुढील हंगाम २८ जून ते ११ जुलै २०२१ या काळात होईल, असे आयोजकांनी जाहीर केले आहे. विम्बल्डन ही टेनिसविश्वातील सर्वात जुनी (सन १८७७ सालापासून) आणि सर्वोच्च मानांकित आंतरराष्ट्रीय स्पर्धा आहे. ही स्पर्धा लंडन (इंग्लंड) येथील ऑॅल इंग्लंड लॉन टेनिस अँड क्रोकुएट क्लब येथे खेळली जाते. विम्बल्डन स्पर्धेच्या विजेत्याला ऑॅल इंग्लंड क्लबचे सभासदपद देण्यात येते.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या