Tuesday, February 3, 2026
Homeब्रेकिंग न्यूजमोठी बातमी! जिल्हा परिषद, नगरपंचायतींच्या निवडणुकांचा धुराळा कधी उडणार? समोर आली मोठी...

मोठी बातमी! जिल्हा परिषद, नगरपंचायतींच्या निवडणुकांचा धुराळा कधी उडणार? समोर आली मोठी अपडेट

मुंबई | Mumbai
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. नगर परिषद, नगर पंचायतीच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. आता प्रचाराचा धुरळा उडणार आहे. आता जिल्हा परिषद आणि नगरपंचायतींचा धुराळा उडणार आहे. जिल्हा परिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांच्या तारखांच्या संभाव्य तारखा समोर आल्या आहे.

जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकांच्या तारखा कधी जाहीर होणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. राज्यातील ३२ जिल्हा परिषद आणि ३३१ पंचायत समितिच्या निवडणुका ५ डिसेंबर रोजी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नाशिक, रायगड, रत्नागिरी, पुणे, कोल्हापूर, सोलापूर, नांदेड, बीड, अहमदनगर आणि अमरावती यांसारख्या अनेक महत्त्वाच्या जिल्ह्यांमधील जिल्हा परिषदांच्या निवडणुका प्रलंबित आहेत, ज्यांची प्रक्रिया लवकरच सुरू होण्याची चिन्हे आहेत.

- Advertisement -

महसूल प्रशासन विभागात काही मोठे बदल झाले आहेत. राज्यातील ११२ तहसीलदारांना उपजिल्हाधिकारीपदी पदोन्नती देण्यात आली आहे. पुढील काही दिवसांत हे सर्व अधिकारी त्यांच्या बदलीच्या स्थानांवर हजर होतील. त्यांच्या रुजू झाल्याचा दैनंदिन अहवाल विभागीय आयुक्तांकडून मागविण्यात येत असून, ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावर नोव्हेंबरअखेर अथवा डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात निवडणुकांच्या दुसऱ्या टप्प्याचा धुराळा उडण्याची दाट शक्यता आहे.

YouTube video player

जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी नोव्हेंबर अखेरीस अथवा डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात आयोगाकडून पत्रकार परिषद घेतली जाईल, असे सांगण्यात येतेय. पाच डिसेंबरच्या आसपास राज्यात जिल्हा परिषदेच्या निवडणुका होऊ शकतात. त्यानंतर सात दिवस अर्ज स्विकृतीसाठी देण्यात येतील. त्यानंतर सात दिवस अर्ज मागे घेण्याची मुदत असेल. छाननी आणि अंतिम उमेदवार यादी जाहीर होईल. ३१ डिसेंबरच्या आतमध्ये जिल्हा परिषद निवडणुका पूर्ण करण्याचे आयोगाने ठरवले आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

Praful Patel : प्रफुल पटेलांनी घेतली पंतप्रधान मोदी आणि अमित शाहांची...

0
दिल्ली । Delhi महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राज्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली असतानाच, राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) ज्येष्ठ नेते प्रफुल पटेल...