नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
ईशान्य भारतातील छोट्या राज्यांपैकी एक असलेल्या मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ झाली असून, राज्यातील सरकारमधील १२ मंत्र्यांपैकी ८ मंत्र्यांनी राजीनामे दिले आहे. राजीनामा दिलेल्या मंत्र्यांपैकी बहुतांश आमदार हे सरकारमधील ज्येष्ठ नेते आहेत. राजीनामा देणाऱ्या मंत्र्यांमध्ये एनपीपी, यूडीपी, एचएसपीडीपी आणि भाजपच्या मंत्र्यांचा समावेश आहे. मेघालयातील मंत्रिमंडळातील विस्ताराआधीच अनेक नेत्यांनी राजीनामे दिले आहेत.
मेघालयमधील राजकारणात मोठी उलथापालथ झाली असून मंत्रीमंडळातील १२ पैकी ८ मंत्र्यांनी राजीनामा दिला आहे. यात एनपीपीचे अम्पारीन लिंगदोह, कॉमिंगोन यम्बोन आणि रक्कम ए. संगमा यांचा तसेच यूडीपी पक्षाचे अबू ताहीर मंडल, यूडीपीचे पॉल लिंगदोह आणि किरमेन शायला, एचएसपीडीपी पक्षाचे शकलियार वारजरी आणि भाजपाचे के ए एल हेक यांचा समावेश आहे. मेघालयात मंत्रिमंडळ विस्तार होत असल्याने या मंत्र्यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले आहेत.
यासाठी दिला राजीनामा
दरम्यान, कोनराड संगमा हे काही नव्या चेहऱ्यांना मंत्रिमंडळात सहभागी करू इच्छित आहेत. त्यासाठी विद्यमान मंत्र्यांना राजीनामा देण्याच्या सूचना देण्यात आल्या. राजीनामा दिलेले आमदार आता पक्षसंघटनेमध्ये काम करतील. मंत्रिमंडळात सहभागी झालेले नवे आमदार मंगळवारी संध्याकाळी शपथ घेतील. यामध्ये भाजपाच्या कोट्यातील मंत्र्यांचाही समावेश आहे.
मेघालयमध्ये नॅशनल पिपल्स पार्टीचे सरकार आहे. या सरकारचे नेतृत्व कोनराड संगमा यांच्याकडे आहे. संगमा यांच्या सरकारमध्ये अन्य पक्षांचाही समावेश असून या सर्व पक्षांच्या युतीला मेघालय डेमोक्रॅटिक अलायन्स असे म्हटले जाते. २०२३ च्या विधानसभा निवडणुकीनंतर या युतीची स्थापना झाली. ६० सदस्यांच्या विधानसभेत एकूण १२ मंत्री होते. यापेक्षा अधिक मंत्री मेघालयच्या सरकारमध्ये नसतात. त्यातील ८ जणांनी राजीनामा दिला.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा




