Thursday, November 21, 2024
Homeब्रेकिंग न्यूजMaharashtra Politics : शरद पवार आणि एकनाथ शिंदे एकत्र येणार? शिवसेनेच्या नेत्याच्या...

Maharashtra Politics : शरद पवार आणि एकनाथ शिंदे एकत्र येणार? शिवसेनेच्या नेत्याच्या विधानाने चर्चांना उधाण

मुंबई | Mumbai

काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे (NCP Ajit Pawar) नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी विधानसभा निवडणुकीचा (Vidhansabha Election) निकाल लागल्यानंतर कोण कोणाबरोबर असेल, हे आताच सांगता येत नाही”, असे विधान केले होते. त्यानंतर आता मतदान पार पडल्यावर पुन्हा एकदा निकालानंतर काय चित्र असेल? याची चर्चा सुरू झाली आहे. अशातच राजकीय वर्तुळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) हे एकत्र येतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे. यावर आता शिवसेनेचे (शिंदे गट) प्रवक्ते संजय शिरसाट यांनी मोठे विधान केले आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : Nashik Assembly Election 2024 : जिल्ह्यात ६७.९७ टक्के मतदान; कोणत्या मतदारसंघात सर्वाधिक व कमी मतदान

यावेळी बोलतांना संजय शिरसाट (Sanjay Shirsat) म्हणाले की, “शरद पवार यांच्यासोबत जायचं की नाही? याचा निर्णय एकनाथ शिंदेच करू शकतील. आम्हाला यावर भाष्य करता येणार नाही. एकनाथ शिंदे योग्य दिशेने जात असतात. आम्ही त्यांचा शर्ट पकडून जाऊ. एकनाथ शिंदे जो निर्णय घेतील. तो आम्हाला मान्य असेल. ते जिकडं जातील तिकडं आम्ही त्यांच्यासोबत जाणार आहोत”, असे त्यांनी सांगितले. तसेच यावेळी आम्हाला उटी किंवा गुवाहाटी कुठेही जाण्याची गरज भासणार नाही. आम्ही सगळे मुंबईतच (Mumbai) जाऊन जीवाची मुंबई करू. आमदारांचा गटनेता निवडण्यासाठी सर्व आमदारांना एकत्र ठेवावे लागते. त्यासाठी एकदाच हॉटेलवारी करावी लागेल, असेही त्यांनी म्हटले.

हे देखील वाचा : Maharashtra Assembly Election 2024 : राजकीय पक्षांचा अपक्ष उमेदवारांकडे मोर्चा

पुढे ते मुख्यमंत्री (CM) कोण होणार याबाबत विचारलेल्या प्रश्नावर बोलतांना म्हणाले की, “महायुतीचे नेते एकत्रित बसून मुख्यमंत्री कोण हे ठरवणार आहेत.७५ टक्के सर्वे आमच्या बाजूने आहेत. एकनाथ शिंदेंच्या चेहऱ्यावर आम्ही निवडणूक लढवत आहोत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होतील, असा आम्हाला विश्वास आहे. नितीश कुमारांचे उदाहरण पाहिले तरीही मुख्यमंत्री आहेत. वरिष्ठांनी तो निर्णय घ्यायचा आहे. सर्व सामान्यांची भावना ती आहे. एकनाथ शिंदे ज्या भावनेने काम करतात ते लोकांना आवडले आहे. लाडकी बहीण योजना इतकी पावरफुल झाली की महिला (Women) आनंदी आहेत”, असेही संजय शिरसाट यांनी म्हटले.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या