Thursday, March 13, 2025
Homeब्रेकिंग न्यूजNashik Assembly Election 2024 : जिल्ह्यात ६९.१२ टक्के मतदान; कोणत्या मतदारसंघात सर्वाधिक...

Nashik Assembly Election 2024 : जिल्ह्यात ६९.१२ टक्के मतदान; कोणत्या मतदारसंघात सर्वाधिक व कमी मतदान

जाणून घ्या विधानसभानिहाय आकडेवारी

नाशिक | Nashik

गेल्या महिनाभरापासून सुरु असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या (Vidhansabha Election) मतदानाची (Voting) प्रक्रिया बुधवार (दि.२० नोव्हेंबर) रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ६ या वेळेत काही ठिकाणी किरकोळ वाद वगळता सुरळीत पार पडली. यावेळी मतदानास शहरी भागासह ग्रामीण भागातील लोकांनी मोठा प्रतिसाद दिल्याचे पाहायला मिळाले. तर काही मतदान केंद्रांवर मतदानाची मुदत संपल्यानंतरही रांगा लागल्याचे दिसून आले. यामध्ये नाशिक जिल्ह्यात १५ मतदारसंघात सायंकाळी ६ वाजेपर्यंत एकूण ६९.१२ टक्के मतदान झाले. त्यानंतर आता शनिवार (२३ नोव्हेंबर) रोजी निकाल जाहीर होणार आहेत.

- Advertisement -

नाशिक जिल्ह्यातील नांदगाव विधानसभा मतदारसंघात एकूण ७०.७६ टक्के मतदान झाले असून एकूण ३ लाख ४३ हजार ०५६ मतदारांपैकी २ लाख ४२ हजार ७४४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यात १ लाख २८ हजार ३४४ पुरुष तर १ लाख १४ हजार ३९६ महिला आणि इतर ४ जणांचा समावेश आहे. या मतदारसंघात महायुतीचे सुहास कांदे, महाविकास आघाडीचे गणेश धात्रक आणि अपक्ष उमेदवार समीर भुजबळ व डॉ.रोहन बोरसे यांच्यात कडवी झुंज होण्याची शक्यता आहे. तर मालेगाव मध्य मतदारसंघात एकूण ६९.८८ टक्के मतदान झाले असून एकूण ३ लाख ४२ हजार ७१३ मतदारांपैकी २ लाख ३९ हजार ५०१ मतदारांनी मतदान केले. यामध्ये १ लाख २६ हजार १२१ पुरुष तर १ लाख १३ हजार ३७९ महिला आणि इतर १ जणाचा समावेश आहे. या मतदारसंघात एमआयएमचे मौलाना मुफ्ती इस्माईल, काँग्रेसचे एजाज बेग समाजवादी पक्षाचे शान ए हिंद निहाल अहमद आणि माजी आमदार आसिफ शेख यांच्यात काटे की टक्कर होण्याची शक्यता आहे.

तर मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघात एकूण ६७.७५ टक्के मतदान झाले असून एकूण ३ लाख ८० हजार ५७६ मतदारांपैकी २ लाख ५७ हजार ८४३ मतदारांनी मतदान केले.यात १ लाख ३५ हजार ०३४ पुरुष तर १ लाख २२ हजार ८०८ महिला व इतर ०१ जणाचा समावेश आहे. या मतदारसंघात पालकमंत्री व महायुतीचे उमेदवार दादा भुसे, शिवसेनेचे (उबाठा) अद्वय हिरे आणि अपक्ष उमेदवार प्रमोद (बंडू) काका बच्छाव यांच्यात तिरंगी लढत होत आहे. तसेच बागलाण मतदारसंघात एकूण ६८.१५ टक्के मतदान झाले असून एकूण २ लाख ९९ हजार ११८ मतदारांपैकी ०२ लाख ०३ हजार ८६३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये ०१ लाख ०७ हजार ५३० पुरुष तर ९६ हजार ३३३ महिलांचा समावेश आहे. या मतदारसंघात महायुतीचे (भाजप) दिलीप बोरसे आणि महाविकास आघाडीच्या (राष्ट्रवादी शरद पवार पक्ष) दीपिका चव्हाण यांच्यात दुरंगी लढत होत असून त्यांना अपक्षांचे कडवे आव्हान असणार आहे.

कळवण विधानसभा मतदारसंघात एकूण ७५.०७ टक्के मतदान झाले असून एकूण ३ लाख १९ हजार ९९६ मतदारांपैकी २ लाख ३६ हजार ८४५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यात १ लाख २३ हजार १३६ पुरुष व १ लाख १३ हजार ७०९ महिलांनी मतदान केले. या मतदारसंघात महायुतीचे (राष्ट्रवादी अजित पवार) नितीन पवार आणि महाविकास आघाडीचे (मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष) जे.पी.गावित यांच्यात दुरंगी लढत होण्याची शक्यता आहे. तर चांदवड विधानसभा मतदारसंघात एकूण ७६.९३ टक्के मतदान झाले असून एकूण ३ लाख ८८ हजार ८०८ मतदारांपैकी २ लाख ३७ हजार ५५२ मतदारांनी मतदान केले. यात ०१ लाख २६ हजार ४७३ पुरुष व १ लाख ११ हजार ०७९ महिलांचा समावेश आहे. या मतदारसंघात महायुतीचे (भाजप) डॉ.राहुल आहेर, महाविकास आघाडीचे शिरीष कोतवाल आणि अपक्ष उमेदवार केदा आहेर यांच्यात तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे.

येवला विधानसभा मतदारसंघात एकूण ७६.०३ टक्के मतदान झाले असून एकूण ०३ लाख २६ हजार ६२३ मतदारांपैकी ०२ लाख ४९ हजार २०० मतदारांनी मतदान केले. यात एक लाख ३२ हजार ४१९ पुरुष तर एक लाख १६ हजार ७८१ महिलांनी मतदानाचा हक्क बजावला. या मतदारसंघात महायुतीचे (राष्ट्रवादी अजित पवार) छगन भुजबळ आणि महाविकास आघाडीचे (राष्ट्रवादी शरद पवार) माणिकराव शिंदे यांच्यात दुहेरी सामना होणार आहे. सिन्नर विधानसभा मतदारसंघात एकूण ७४.८५ टक्के मतदान झाले असून एकूण तीन लाख २३ हजार ४६४ मतदारांपैकी दोन लाख ४२ हजार ११५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यात एक लाख २९ हजार १८१ पुरुष व एक लाख १२ हजार ९३४ महिलांनी मतदान केले. या मतदारसंघात महायुतीचे (अजित पवार गट) माणिकराव कोकाटे आणि महाविकास आघाडीचे (शरद पवार गट) उदय सांगळे यांच्यात लढत होणार आहे.

निफाड विधानसभा मतदारसंघात एकूण ७४.१२ टक्के मतदान झाले असून एकूण दोन लाख ९८ हजार ८६८ मतदारांपैकी दोन लाख २१ हजार ५०९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये एक लाख १५ हजार ८४८ पुरुष तर एक लाख ०५ हजार ६६१ महिलांनी मतदान केले. या मतदारसंघात महायुतीचे (अजित पवार गट) दिलीप बनकर आणि महाविकास आघाडीचे (शिवसेना उबाठा) अनिल कदम व प्रहार जनशक्ती पक्षाचे गुरुदेव कांदे यांच्यात सामना होणार आहे. दिंडोरी विधानसभा मतदारसंघात एकूण ७८.०५ टक्के मतदान झाले असून एकूण तीन लाख २९ हजार १३६ मतदारांपैकी दोन लाख ५६ हजार ९०५ मतदारांनी मतदान केले. यात एक लाख ३५ हजार १३८ पुरुष तर एक लाख २१ हजार ७६६ महिला व इतर ०१ जणाचा समावेश आह. या मतदारसंघात महायुतीचे (अजित पवार गट) नरहरी झिरवाळ आणि महाविकास आघाडीच्या (शरद पवार गट) सुनिता चारोस्कर यांच्यात दुहेरी सामना होणार आहे.

नाशिक पूर्व मतदारसंघात एकूण ५८.६३ टक्के मतदान झाले असून एकूण ०४ लाख ०९ हजार २३९ मतदारांपैकी ०२ लाख ३९ हजार ९५१ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यात ०१ लाख २४ हजार ७०५ पुरुष तर ०१ लाख १५ हजार ८७० महिला व इतर ०६ जणांचा समावेश आहे. या मतदारसंघात महायुतीचे (भाजप) राहुल ढिकले आणि महाविकास आघाडीचे (राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट) गणेश गीते यांच्यात दुहेरी लढत होत आहे. नाशिक मध्य मतदारसंघात एकूण ५७.६८ टक्के मतदान झाले असून एकूण ०३ लाख ४५ हजार ३९३ मतदारांपैकी ०१ लाख ९२ हजार २१३ मतदारांनी मतदान केले. यात ०१ लाख ०२ हजार ९१८ पुरुष तर ९६ हजार २६६ महिला व इतर २६ जणांचा समावेश आहे. या मतदारसंघात महायुतीच्या (भाजप) देवयानी फरांदे महाविकास आघाडीचे (शिवसेना उबाठा) वसंत गीते व वंचित बहुजन आघाडीचे मुशीर सय्यद यांच्यात तिहेरी होण्याची शक्यता आहे.

नाशिक पश्चिम मतदारसंघात एकूण ५६.७१ टक्के मतदान झाले असून एकूण ०४ लाख ८३ हजार ४९५ मतदारांपैकी ०२ लाख ७४ हजार २०८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये ०१ लाख ४७ हजार ३८२ पुरुष तर ०१ लाख २६ हजार ८२३ महिला व इतर ०३ जणांचा समावेश केले. या मतदारसंघात महायुतीच्या (भाजप) सीमा हिरे, महाविकास आघाडीचे (शिवसेना उबाठा) सुधाकर बडगुजर आणि मनसेचे दिनकर पाटील यांच्यात तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे. देवळाली विधानसभा मतदारसंघात एकूण ६३.३९ टक्के मतदान झाले असून एकूण ०२ लाख ८८ हजार १४१ मतदारांपैकी ०१ लाख ८२ हजार ६६५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये ९६ हजार १७५ पुरुष तर ८६ हजार ४८९ महिला व इतर ०१ जणाचा समावेश आहे. या मतदारसंघात महायुतीच्या (राष्ट्रवादी अजित पवार गट) सरोज अहिरे, महाविकास आघाडीचे (शिवसेना उबाठा) योगेश घोलप आणि शिवसेना शिंदे गटाच्या राजश्री अहिरराव यांच्यात लढत होण्याची शक्यता आहे.

इगतपुरी विधानसभा मतदारसंघात एकूण ७६.३३ टक्के मतदान झाले असून एकूण ०२ लाख ८० हजार ५५९ मतदारांपैकी ०२ लाख १४ हजार १४४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यात ०१ लाख ११ हजार ६०७ पुरुष तर ०१ लाख २ हजार ५३५ महिला व इतर ०२ जणांचा समावेश आहे. या मतदारसंघात महायुतीचे (राष्ट्रवादी अजित पवार गट) हिरामण खोसकर, महाविकास आघाडीचे (काँग्रेस) लकी जाधव, मनसेचे काशिनाथ मेंगाळ आणि अपक्ष उमेदवार निर्मला गावित यांच्यात ‘काटे की टक्कर’ होण्याची शक्यता आहे. दरम्यान नाशिक जिल्ह्यातील १५ विधानसभा मतदारसंघातील एकूण ५० लाख ६१ हजार १८५ मतदानापैकी ३४ लाख ९८ हजार २५८ मतदान झाले. यामध्ये १८ लाख ४१ हजार ३८१ पुरुष तर १६ लाख ५६ हजार ८२३ महिलांनी मतदानाचा हक्क बजावला.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Dadasaheb Khindkar : धनंजय देशमुखांचा साडू पोलिसांना शरण; तरुणाला केली होती...

0
मुंबई | Mumbai मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर बीड येथील मारहाणीचे विविध व्हिडीओ व्हायरल होत आहेत. सगळ्यात आधी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांना (Santosh Deshmukh) मारहाण...