Thursday, September 19, 2024
HomeमनोरंजनBig Boss Marathi Fame Suraj Chavan in Movie : गुलीगत 'सुरज चव्हाण'...

Big Boss Marathi Fame Suraj Chavan in Movie : गुलीगत ‘सुरज चव्हाण’ झळकणार मोठ्या पडद्यावर

बिग बॉस मराठी’चे यंदाचे पर्व मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. या पर्वाने मोठ्या प्रमाणात TRP मिळवला आहे. या पर्यातील प्रत्येक स्पर्धक आपली स्वतःची वेगळी ओळख निर्माण करत आहे. या शोमध्ये एक असा स्पर्धक आहे ज्याने सर्वांच्या मनात स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.

- Advertisement -

या स्पर्धकाचे नाव आहे गुलिगत सुरज चव्हाण, टिक टॉक स्टार सुरज चव्हाण अशी त्याची बिग बॉसमध्ये येण्याच्या अगोदर ओळख होती. सूरजने अल्पावधीतच प्रेक्षकांची मन जिंकत त्यांच्यावर राज्य केलं. सूरज चव्हाणचा जन्म छोट्याशा खेडे गावात झाला असून त्याने बिग बॉस सारख्या झगमगाटात येऊन स्वतःचं असं स्थान स्वतः मिळवलं आहे.

हे ही वाचा : ‘त्या’ नराधमाचा ‘चौरंग’ करा…; बदलापूर प्रकरणावर रितेश देशमुखची संतप्त प्रतिक्रिया

सध्या ‘बिग बॉस मराठी’मुळे सूरज भलतात चर्चेत आला आहे. रिऍलिटी शोद्वारे सूरज जरी आता प्रेक्षकांच्या भेटीला आला असला, तरी तो आता मोठ्या पडद्यावरही झळकण्यास सज्ज होताना पाहायला मिळणार आहे. लवकरच सूरज त्याच्या आगामी ‘राजाराणी’ या चित्रपटातून मोठा पडदा गाजवताना दिसणार आहे. काही दिवसांपूर्वीच ‘राजाराणी’ या चित्रपटाच्या पोस्टरने सान्यांचीच मन जिंकली.

सूरज आता सत्य घटनेवर आधारित उलगडणाऱ्या या प्रेम कथेतून महत्वपूर्ण भूमिका साकारत प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटात मुख्य कलाकाराच्या मित्राच्या भूमिकेत सूरजला पाहणं फारच रंजक ठरणार आहे. ‘राजाराणी’ या चित्रपटात प्रमुख भूमिकेत रोहन पाटील आणि वैष्णवी शिंदे ही कलाकार मंडळी दिसणार आहेत.

हे ही वाचा : निधनाच्या अफवांवर श्रेयस तळपदे भडकला; म्हणाला, “मी जिवंत आहे, माझी मुलगी…”

सूरज चव्हाण हा चित्रपटातील रोहनच्या मित्राच्या महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात भारत गणेशपुरे, सुरेश विश्वकर्मा, माधवी जुवेकर, भक्ती चव्हाण, शिवाजी दोलताडे, तानाजी गलगुंडे या कलाकारांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत.

‘या’ दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला येणार चित्रपट

‘सोनाई फिल्म क्रिएशन’ प्रस्तुत ‘राजाराणी’ चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद, गीतलेखन व निर्मिती गोवर्धन दोलताडे यांनी केली आहे. तर चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी शिवाजी दोलताडे यांनी सांभाळली आहे. राजाराणी हा चित्रपट १८ ऑक्टोबर २०२४ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

हे ही वाचा : Gautami Patil : गौतमी पाटीलला दिलासा! अटी-शर्तींनुसार जामीन मंजूर, नेमकं प्रकरण…

- Advertisment -

ताज्या बातम्या