पाटणा | Patna
बिहार निवडणुकीत जन सुराजला एकही जागा न मिळाल्याने प्रशांत किशोर जे देशातील सर्वात यशस्वी निवडणूक रणनीतीकार समजले जातात त्यांच्या राजकीय प्रवासाला पहिल्याच क्षणी तगडा झटका बसला आहे. देशात किंवा कुठल्याही राज्यात एखाद सरकार सत्तेवर असेल, तर पाच वर्षानंतर त्या सरकार विरोधात एक लाट असते. प्रस्थापित सरकार विरोधी लाट त्याला म्हणतात. अँटी इन्कमबंसी फॅक्टर असतो. पण भाजपचे ज्या-ज्या राज्यात सरकार आहे, तिथे मात्र या उलट ट्रेंड दिसून येतोय. बिहारच्या निवडणुकीत बदलण्यासाठी तिसरा पर्याय’ उभा करण्याचा दावा या सर्व गोंगाटानंतरही निकालाने प्रशांत किशोर यांची निराशा झाली आहे.
मतमोजणी सुरू होऊन साडेतीन तास उलटले तरी, प्रशांत किशोर यांच्या पक्षाच्या जनसुराज यांना किती मते मिळाली हे अद्याप अज्ञात आहे. २०० हून अधिक जागा लढवणाऱ्या पीके यांच्या पक्षाला किती मते मिळाली हा प्रश्न उपस्थित झाला आहे कारण मतदानाच्या टक्केवारीच्या आकडेवारीत नोटा दिसून येतो. सध्या, असे मानले जाते की बिहारमधील २०० हून अधिक विधानसभा जागांवर निवडणूक लढवणारा एकमेव पक्ष जनसुराज यांना आयोगाच्या आकडेवारीनुसार “इतर पक्ष” म्हणून वर्गीकृत केले जात आहे.
२०२४ मध्ये जनसुराज्य पक्षाची स्थापना
प्रशांत किशोर यांनी देशात ३ हजार किलोमीटरची पदयात्रा केली, आणि “हड्डी जळाली” म्हणत स्वतःच्या श्रमांचा उल्लेखही केला. ३० कोटी व्ह्यूजचा डिजिटल गाजावाजा केला, ५० ते ७० लाख स्थलांतरित बिहारात राहिल्याचा अंदाज आणि त्यापैकी “किमान दोन-तृतीयांश आमच्याकडे येतील” हा दावा या सर्वांमुळे प्रशांत किशोर स्वतःच आपल्या अपेक्षांच्या जाळ्यात अडकले.
पाटण्यातील राजकीय वर्तुळाने अंदाज आधीच व्यक्त केला होता आणि निकालांनी त्याचीच पुष्टी केली. प्रशांत किशोर यांना यावेळी जिंकता आले नाही. इतकेच नाही, ते स्पर्धेतसुद्धा नाहीत हे स्पष्ट झाले आहे. रणनीतीचे मास्टरमाईंड असलेले प्रशांत किशोर स्वतःच्या मैदानात शुन्यावर रनआऊट झाले. हा पराभव नव्हे, तर ‘भूगोल बदलण्याचा आत्मविश्वास’ विरुद्ध ‘भूगोलाने दाखवलेली वास्तवता’ अशी झाली आहे.
यामुळे झाला घात
बिहारमधील बहुतांश लोकसंख्या ग्रामीण आहे. जन सुराज पार्टी अजूनपर्यंत तिथपर्यंत पोहोचू शकलेली नाही. ग्रामीण मतदारांना जन सुराज पार्टीच निवडणूक चिन्ह आणि उमेदवार माहित नव्हते. त्यामुळे तळागाळातील मत त्यांना मिळाली नाहीत. प्रशांत किशोर यांनी बिहार पिंजून काढला. पण त्यांना अजून बरच काम करावे लागेल.
बिहारच राजकारण जाती आणि धर्माच्या मजबूत समीकरणावर आधारित आहे. जन सुराजने शिक्षण, आरोग्य आणि रोजगार या विषयावर लक्ष केंद्रीत करत पारंपारिक राजकारणाता बगल देण्याचा प्रयत्न केला.
प्रशांत किशोर यांनी सार्वजनिकरित्या भाजपवर आरोप केला. उमेदवारी मागे घेण्यासाठी माझ्या उमेदवारांवना धमकावल जातय, त्यांना प्रलोभनं दिली जात असल्याचा आरोप केला. काही उमेदवारांनी आपली उमेदवारी मागे घेतली. त्यामुळे पक्षाच्या निवडणूक मोमेंटमला धक्का बसला.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा




