Sunday, January 25, 2026
Homeदेश विदेशBihar Assembly Election 2025: तेजस्वी यादव आणि भाजपच्या सतीश कुमारमध्ये काँटे की...

Bihar Assembly Election 2025: तेजस्वी यादव आणि भाजपच्या सतीश कुमारमध्ये काँटे की टक्कर; काँग्रेसमुळे आरजेडीचा घात?

पाटणा | Patna
बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होण्यास अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. मतमोजणी सुरू असून आतापर्यंतच्या कलानुसार बिहारमध्ये एनडीए आघाडीवर आहे. एनडीएने बहुमताचा आकडा पार केला असून ते १८८ जागांवर आघाडीवर आहेत. त्यामुळे बिहारमध्ये पुन्हा एनडीएचे सरकार येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आतापर्यंतच्या कलानुसार एनडीएने आरजेडीचा सुपडा साफ केला.

सध्याचा जो कल आहे त्यानुसार एनडीए १८७ आणि महाआघाडी ४७ जागांवर आघाडीवर आहे. हा खुप मोठा फरक आहे. मूळात म्हणजे नितीश कुमार हे २० वर्षांपासून मुख्यमंत्री पदावर आहेत. आताही मुख्यमंत्री पदासाठी भाजपने त्यांचाच चेहरा पुढे केला आहे. बिहारमध्ये यंदाच्या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात रेकॉर्ड ब्रेक मतदान झाले आहे. या निवडणुकीत बिहारमध्येही महिलांचे मतदान गेमचेंजर ठरताना दिसत आहे. सामान्यत: जेव्हा इतक्या मोठ्या प्रमाणात मतदान होते, ते सत्ता उलथवण्यासाठी असते. पण बिहारमध्ये मात्र उलटे घडताना दिसत आहे. हे वाढलेले मतदान नितीश कुमार आणि भाजपची सत्ता टिकवण्यासाठी आहे.

- Advertisement -

महाआघाडीचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार पराभवाच्या छायेत आहे. आरजेडीचे नेते तेजस्वी यादव पिछाडीवर आहेत. आरजेडीचा बालेकिल्ला असलेल्या राघोपुरमध्ये तेजस्वी यादव हे पिछाडीवर आहेत. भाजपच्या सतीश कुमार यांनी आघाडी घेतली आहे. तेजस्वी यादव यांना भाजपचे उमदेवार सतीश कुमार यांनी मागे टाकले आहे. सुरवातीला तेजस्वी यादव यांनी जोरदार मुसंडी मारली पण काही कलांमध्ये तेजस्वी यादव पिछाडीवर पडले.

YouTube video player

दरम्यान, लालू प्रसाद यादव यांच्या दोन्ही मुलांनी निवडणूक लढवली. तेजस्वी यादव आणि तेजप्रताप यादव हे दोघेही पिछाडीवर आहेत. तेजस्वी यादव बिहारच्या राघोपुर मतदारसंघातून तिसऱ्यांदा निवडणूक लढवत आहेत. याठिकाणी भाजपचे उमेदवार सतीश यादव हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तेजस्वी यादव आणि सतीश यादव यांच्यामध्ये काँटे की टक्कर सुरू आहे. इथे कोण बाजी मारेल? हे चित्र काही तासांत स्पष्ट होईल.

काँग्रेसमुळे आरजेडीला फटका बसू शकतो
आरजेडी ३१ पेक्षा जास्त तर काँग्रेसच्या जागांचा आकडा ५ वर आहे. म्हणजे आरजेडी सोबत नसेल तर काँग्रेसची अवस्था यापेक्षा वाईट होऊ शकते. आघाडीमध्ये तुल्यबळ पार्टनर नसेल, एकटा खेळून किती खेळणार असा प्रश्न निर्माण होतो. उलट काँग्रेसमुळे आरजेडीचा फायदा कमी नुकसान जास्त होतय.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

लालू यादवांनी RJD मध्ये केले मोठे बदल! कार्यकारी अध्यक्षपदी तेजस्वी यादव...

0
पाटणा । Patana बिहारच्या राजकारणात आणि विशेषतः राष्ट्रीय जनता दलात (राजद) आज एका नवीन पर्वाचा उदय झाला आहे. पक्षाचे युवा नेते तेजस्वी यादव यांची राजदच्या...