दिल्ली | Delhi
बिहार विधानसभेचा कार्यकाळ 29 नोव्हेंबरला संपतो आहे. या पार्श्वभूमीवर आज बिहार विधानसभा निवडणुकांच्या तारखा घोषित होण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोगाकडून आज दुपारी 12.30 वाजता दिल्लीतील विज्ञान भवनमध्ये पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.
देशात करोनाचा धोका वाढलेला असताना या पहिल्याच मोठ्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे वेगळंच आव्हान निवडणूक आयोग आणि राजकीय पक्षांसमोरही असणार आहे. बिहारमध्ये तीन टप्प्यांत निवडणुका होऊ शकतात. गेल्या निवडणुकीत पाच टप्प्यांत मतदान पार पडलं होतं. यंदा निवडणुकीत करोना गार्डलाईन्सचा पालन हेच मोठं आव्हान ठरणार आहे. तसेच, बिगर विधानसभेत आज मध्यप्रदेश मधल्या पोट निवडणुकाही जाहीर होण्याची शक्यता आहे.बिहार विधानसभेत सोबत आज मध्यप्रदेश मधल्या पोटनिवडणुकाही जाहीर होण्याची शक्यता. ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या बंडानंतर जवळपास २७ जागांवर निवडणुका अपेक्षित आहेत. तसेच, मध्यप्रदेश साठी मिनी विधानसभा असणार आहे.