Friday, January 23, 2026
Homeदेश विदेशBihar Assembly Election 2025: महिलांच्या खात्यात १० हजार जमा; एनडीएच्या विजयाचा मार्ग...

Bihar Assembly Election 2025: महिलांच्या खात्यात १० हजार जमा; एनडीएच्या विजयाचा मार्ग सुकर?महिला रोजगार योजनेमुळे बिहारमध्ये वारं फिरलं?

बिहार | Bihar
बिहार विधानसभा निवडणूक 2025 मध्ये महिला मतदारांची संख्या सत्तेची गणितं मोडीत काढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. महिला मतदारांनी सर्व रेकॉर्ड मोडीत काढले आहे. दोन्ही टप्प्यातील एकत्रित गणनेनुसार, या निवडणुकीत 71.61 टक्के महिलांना मतदानाचा हक्क बजावला आहे. 2020 मध्ये महिला मतदानाचे प्रमाण 59.69 टक्के होते. म्हणजे गेल्या वेळीच्यात तुलनेत यंदा 10 टक्के अधिक महिलांना मतदान केले आहे. बिहार निवडणुकीच्या तोंडावर ७५ लाख महिलांना प्रत्येकी १० हजार रुपये थेट त्यांच्या खात्यात जमा झाले.

ही रक्कम मुख्यमंत्री महिला रोजगार योजना (CMWES) अंतर्गत देण्यात आली. महिलांना स्वयंरोजगार सुरू करण्यासाठी आणि लघु उद्योग चालवण्यासाठी आर्थिक मदत करणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे. महिला मतदारांची मतदान प्रक्रियेतील सक्रियेता भाजप-नितीश कुमार यांच्या बाजूने झुकत असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. सत्ताविरोधी लाट या महिला लाटेत वाहून गेल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

- Advertisement -

बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएने सत्ता राखण्याच्या दिशेने वाटचाल सुरु केली आहे. बिहारमधील महिलांना ही रक्कम थेट लाभ हस्तांतरण (DBT) द्वारे थेट महिलांच्या बँक खात्यात हस्तांतरित केली जाते. ही योजना २९ ऑगस्ट २०२५ रोजी सुरू करण्यात आली आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ती व्हर्च्युअल पद्धतीने सुरू केली. डिसेंबर २०२५ पर्यंत शक्य तितक्या पात्र महिलांना या योजनेत समाविष्ट करण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे.

YouTube video player

महिला मतदारांची मोठी गर्दी
बिहारच्या मतदानाच्या पहिल्या टप्प्यात पाटणा सोडून अन्य १७ जिल्ह्यांमध्ये महिला मतदानाची टक्केवारी पुरुषांपेक्षा अधिक होती. १८ पैकी ७ जिल्ह्यांमध्ये महिला मतदानाची टक्केवारी ७० टक्क्यांपेक्षा जास्त दिसली. यामध्ये सर्वाधिक समस्तीपूर जिल्ह्यात ७७.४२ टक्के महिला मतदारांचा सक्रिय सहभाग दिसला. त्यानंतर मधेपुरा जिल्ह्यात ७७.०४ टक्के महिलांनी मतदान केले. तर मुजफ्फरपूर तिसऱ्या क्रमांकावर होता, येथे ७६.५७ टक्के महिलांनी मतदानाचा हक्क बजावला. तर दुसऱ्या टप्प्यात असे ७ जिल्हे आहेत जिथे ७० टक्क्यांहून अधिक मतदान झाले आहे. यामध्ये कटिहार, किशनगंज, पूर्णिया, सुपौल, पूर्वी चंपारण, पश्चिम चंपारण आणि बांका यांचा समावेश आहे. दुसऱ्या टप्प्यात पुरुषांच्या तुलनेत महिला मतदानाचा टक्केवारी १० टक्के जास्त आहे. म्हणजे या जिल्ह्यांमध्ये महिला मतदारांनी निवडणुकीत सक्रिय सहभाग नोंदवला.

महिलांमध्ये नितीश बाबूंची चलती
नीतीश कुमार महिलांमध्ये लोकप्रिय आहेत कारण त्यांच्या सरकारने महिलांच्या बँक खात्यात 10 हजार रुपयांचे थेट हस्तांतरणासारखे भरीव आर्थिक सहाय्य प्रदान केले. महिलांना स्वयंरोजगार आणि उद्योजक बनण्यास प्रोत्साहित करणे, स्थानिक महिला गटांद्वारे व्यापक सक्षमीकरण आणि महिलांसाठी आरक्षणासह नेतृत्वाच्या संधी उपलब्ध करून देणे हे त्यांच्या लोकप्रियतेला कारणीभूत ठरणारे प्रमुख घटक आहेत.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

Ahilyanagar : जिल्ह्यात एक लाखांहून अधिक लाडक्या बहिणींची अडचण?

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळवण्यासाठी आवश्यक असलेल्या ऑनलाइन ई-केवायसी प्रक्रियेने नगर जिल्ह्यातही महिलांची डोकेदुखी वाढवली. त्यातच जानेवारी महिन्यात अनेक पात्र...