पाटणा | Patana
संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेल्या बिहार विधानसभा निवडणुकीमध्ये (Bihar Assembly Elections) महागठबंधनने म्हणजेच महाआघाडीने एकमताने मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असेल याची घोषणा राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत (Former Rajasthan CM Ashok Gehlot) यांनी पाटण्यामध्ये आयोजित पत्रकार परिषदेमध्ये केली आहे. बिहार निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यापूर्वी जागावाटपावरून सुरू असलेल्या मतभेदांमध्ये, महागठबंधनने (Mahagathabandhan) आज संयुक्त पत्रकार परिषद घेतली. महागठबंधनने तेजस्वी यादव (Tejashwi Yadav) यांना मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून घोषित केले आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक गेहलोत यांनी महागठबंधन जिंकल्यास तेजस्वी यादव आणि मुकेश साहनी (Mukesh Sahni) यांना अनुक्रमे मुख्यमंत्रीपदाचे आणि उपमुख्यमंत्रीपदाचे चेहरे म्हणून घोषित केले आहे.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक गेहलोत यांनी आज हा निर्णय जाहीर करताना तेजस्वी (Tejashwi Yadav) यांच्या नेतृत्वाखालीच महागठबंधन निवडणूक लढणार असल्याचं जाहीर केलं. या घोषणे अगोदरच आरजेडीने तेजस्वी यादव (RJD Tejashwi Yadav)सिंहासनावर बसले असा फोटो सोशल मीडियावर व्हायरल केला आहे, ज्यामुळे महाआघाडीच्या एकजुटीचा आणि आत्मविश्वासाचा संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.
मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करताना अशोक गेहलोत म्हणाले, देशाच्या सध्याच्या स्थितीबद्दल काळजी करणे महत्त्वाचे आहे. देश कुठे चालला आहे हे कोणालाही माहिती नाही. देशभरात बेरोजगारी मोठ्या प्रमाणात आहे. या काळात देशाला आवश्यक असलेल्या सर्व गोष्टींची काळजी घेणे ही आपली जबाबदारी आहे. शेतकरी (Farmer), कामगार, सामान्य लोक, विद्यार्थी आणि तरुणांचीही परिस्थिती अशीच आहे. जेव्हा हे घडते तेव्हा लोकांना बदल हवा असतो आणि यावेळी बदल घडेल. जनतेने कसा प्रतिसाद दिला हे संपूर्ण देशाने पाहिले.




