नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
बिहार निवडणुकीसोबतच, सहा राज्यांमध्ये आठ विधानसभा जागांसाठी आणि एका केंद्रशासित प्रदेश, जम्मू आणि काश्मीरमध्ये पोटनिवडणुका झाल्या. एका केंद्रशासित प्रदेशासह सात राज्यांमधील आठ विधानसभा जागांसाठी झालेल्या या पोटनिवडणुकांचे निकाल देखील आज जाहीर होणार आहेत. बिहारच्या शेजारील झारखंड, पंजाब, राजस्थान, ओडिशा, तेलंगणा आणि मिझोरम या राज्यांमध्ये प्रत्येकी एक विधानसभा जागा समाविष्ट आहे. जम्मू आणि काश्मीर या केंद्रशासित प्रदेशातील दोन विधानसभा जागांसाठी मतदान झाले.
अंतामध्ये भाजपला फटका
राजस्थानच्या अंता मतदारसंघात सत्ताधारी भाजपाला मोठा फटका बसला आहे. याठिकाणी काँग्रेस उमेदवाराने निर्णायक आघाडी घेतली आहे. दुसरीकडे झारखंडच्या घाटशिला मतदारसंघातून माजी मुख्यमंत्री चंपई सोरेन यांच्या मुलाने भाजपा उमेदवाराला मागे टाकले आहे.
मिझोरममध्ये मिझो नॅशनल फ्रंटचे उमेदवार विजयी
मिझोरम येथील डम्पा मतदारसंघात मिझो नॅशनल फ्रंटचे डॉ. आर ललथंगलियाना ५६२ मतांनी विजयी झाले आहेत. या मतदारसंघात दुसऱ्या क्रमांकावर झोरम पिपल मूव्हमेंटचे उमेदवार राहिलेत. इथे भाजपा उमेदवाराला १५४१ मते पडली आहेत. पंजाबच्या तरनतारन येथे आम आदमी पक्षाचा उमेदवार आघाडीवर आहे. जम्मू काश्मीरच्या नागरोटा जागेवर भाजपाने विजय मिळवला आहे. बडगाम येथे मेहबूबा मुफ्ती यांची पीडीपी आघाडीवर आहे. तेलंगणा येथे जुबली हिल्समध्ये काँग्रेस आणि ओडिशाच्या नुआपाडा येथे भाजपा आघाडीवर आहे. एकूण पोटनिवडणुकीच्या ८ जागांपैकी ६ जागांवर भाजपाची पिछेहाट झाली आहे.
पंजाबमध्ये आप आघाडीवर
पंजाबमध्ये आम आदमी पक्षाने तरणतारन जागेवर सुरुवातीला पिछाडीवर राहिल्यानंतर आता आघाडी घेतली आहे. मतमोजणीच्या १० फेऱ्यांनंतर आम आदमी पक्षाचे उमेदवार हरमीत सिंग संधू 7,294 मतांनी आघाडीवर आहे. हरमीत यांना 26,892 मते मिळाली आहेत. शिरोमणी अकाली दलाच्या सुखविंदर कौर 19,598 मतांसह दुसऱ्या स्थानावर आहेत. काँग्रेसचे करणबीर सिंग यांना 10,139 मते मिळाली आहेत. भाजपचे हरजीत सिंग संधू 3,659 मते मिळाली आहेत आणि ते पाचव्या स्थानावर आहेत.
ओडिशात बीजेडीचे ढोलकिया आघाडीवर
तर ओडिशामध्ये बिजू जनता दलाचे (बीजेडी) राजेंद्र ढोलकिया ओडिशातील नुआपाडा विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले. माजी मंत्री ढोलकिया यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या नुआपाडा मतदारसंघात 79.41 टक्के मतदान झाले. सुरुवातीच्या कलांमधून भाजपचे जय ढोलकिया आघाडीवर असल्याचे दिसून येते.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा




