मुंबई | Mumbai
बिहार विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होत असताना महाराष्ट्रातून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. सध्या संजय राऊत आजारी आहेत. त्यांना काही दिवसांपूर्वी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना सार्वजनिक जीवनापासून थोडे लांब राहण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे राऊत सध्या माध्यमांपासून लांब आहेत. दोन महिन्यांनी मी पुन्हा ठणठणीत होऊन येईन असे संजय राऊत म्हणाले आहेत.
बिहार निवडणुकीच्या मतमोजणीत काँग्रेस आणि त्यांची आघाडी चांगलीच पिछाडीवर पडलीये. या निवडणूकीचे पडसाद महाराष्ट्रात देखील दिसून येतायत. अशातच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत ट्विट करून याबाबत प्रतिक्रिया दिलीये. बिहारमध्ये एकदम महाराष्ट्र पॅटर्न, असा टोला राऊतांनी विरोधकांना लगावलाय.
संजय राऊतांचे ट्विट चर्चेत
बिहार विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होत असताना संजय राऊत यांची प्रतिक्रिया आली आहे. “बिहाराच्या विधानसभा निवडणुका निकालाने धक्का बसण्याची गरज नाही. निवडणूक आयोग आणि बी जे पी यांचे हातात हात घालून जे राष्ट्रीय कार्य सुरू होते ते पाहता यापेक्षा वेगळा निकाल लागणे शक्य नव्हते!. एकदम महाराष्ट्र पॅटर्न!. जी आघाडी सत्तेवर येणार याची खात्री होती त्याना ५० च्या आत संपवले!” अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे.
बिहारमध्ये काय चित्र?
आता बिहारच चित्र सुद्धा असच आहे. भाजपप्रणीत एनडीए १९८ आणि काँग्रेस प्रणीत महाआघाडीला फक्त ३५ जागा मिळाल्या आहेत. भाजपकडे ९१, नितीश कुमार यांच्या जेडीयूचे ८०, एलजेपी २२ आणि एचएएम ५ जागांवर आघाडीवर आहे. तर दुसरीकडे राष्ट्रीय जनता दलाला २६, काँग्रेसला ४ आणि डावे ४ जागांवर आघाडीवर आहेत.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा




