Monday, May 20, 2024
Homeनगरमोटारसायकलची स्कुटीला धडक; दोन महिला जखमी

मोटारसायकलची स्कुटीला धडक; दोन महिला जखमी

नेवासा |तालुका वार्ताहर| Newasa

मोटारसायकल स्वाराने बसस्थानकाकडे वळत असलेल्या स्कुटीला धडक दिल्याने दोन महिला जखमी झाल्या. यात एका महिलेचे चार दात पडले. मोटारसायकलस्वार जखमींना मदत न करता पळून गेला. याबाबत दाखल फिर्यादीवरून मोटारसायकलस्वारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

याबाबत रुग्णालयात उपचार घेत असलेल्या अपघातातील जखमी दीपाली राहुल शिंदे (वय 36) धंदा-घरकाम रा. सुरेगावगंगा, ता. नेवासा यांनी दिलेल्या जबाबावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जबाबात म्हटले की, मी नेवासाफाटा येथील रुग्णालयात आयसीयू वॉर्डमध्ये उपचार घेत आहे. 8 मे रोजी दुपारी पावणेतीन वाजता मी व माझी मैत्रीण भाग्यश्री कैलास कर्डिले असे आम्ही त्यांची स्कुटी (क्र. एमएच 17 बीव्ही 4714) वर बसून गणपती चौकातून बसस्थानक नेवासा खुर्दकडे जात असताना मी पाठीमागे बसलेली होती तसेच माझी मैत्रीण भाग्यश्री ही स्कुटी चालवत असताना आम्ही बसस्थानकडे वळत असताना समोरून अचानक करिष्मा कंपनी मोटारसायकल (क्र. एमएच 20 बीडब्ल्यू 0774) ही भरधाव वेगात आमच्या स्कुटीला जोरात मधोमध धडकली.

त्यावेळी मी खाली पडले असता माझे तोंडातून रक्त येऊ लागले व माझे चार दात पडले. तसेच माझ्या मैत्रीणीला मुक्का मार लागला. माझ्या दुखापतीस करिष्मा कंपनी मोटारसायकलवरील चालक सुलतान शेख (पूर्ण नाव माहीत नाही) हा कारणीभूत असून अपघाताची खबर न देता व मला मदत न करता पळून गेला. या फिर्यादीवरून नेवासा पोलिसांनी मोटारसायकल चालकाविरुद्ध भारतीय दंड विधान कलम 279, 337, 338, 427, मोटार वाहन कायदा कलम 184, 177, 134, 134 (ब) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या