गणेशवाडी |वार्ताहर| Ganeshwadi
नेवासा (Newasa) तालुक्यातील घोडेगाव येथे एका पेट्रोल पंपासमोर दुचाकीच्या धडकेत एकाचा मृत्यू (Death) झाल्याची घटना घडली आहे. घोडेगाव (Ghodegav) येथील एका पेट्रोल पंपासमोर मयत संतोष पिराजी मनोरे (वय 45) रा. घोडेगाव हे रस्ता ओलांडून जात असताना समोरुन दीपक उद्धव पवार (रा. शिंगवे तुकाई) हे आपल्या दुचाकीवरुन (एमएच 17 डीडी 7727) भरधाव जात असताना त्यांची जोराची धडक (Hit) संतोष मनोरे यांना बसली होती. त्यात ते गंभीररीत्या जखमी (Injured) झाले होते. नगर येथील सरकारी रुग्णालयात उपचार सुरू असताना ते मयत झाले.
सुरज संतोष पुंड यांनी सोनई पोलीस ठाण्यात (Sonai Police Station) दाखल केलेल्या फिर्यादी वरुन गुन्हा र. नं. 243/2025 बिएनएस चे कलम 106,281,125(अ), (ब), 324(4), (5), मोटार वाहन कायदा कलम 184 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार मच्छिंद्र आडकित्ते हे करत आहेत.





