Friday, June 14, 2024
Homeमुख्य बातम्याअज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

पेठ | प्रतिनिधी

- Advertisement -

नाशिक-पेठ महामार्गावर आज दुपारी तीन वाजेच्या दरम्यान अज्ञात वाहनाने दुचाकीस धडक दिल्याने दुचाकी स्वाराचा मृत्यू झाला.

सविस्तर वृत्त असे की पेठ- नाशिक राष्ट्रीय महामार्ग क्र . ८४८ वर बोरवठ फाट्या नजिक दुचाकीला दुपारी तीन वाजे दरम्यान अज्ञात वाहनाने यामाहा Fzs दुचाकी क्रमांक एमएच १५, जीएस ७७६५ यास धडक दिली.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

अपघातात गंभीर जखमी व्यक्तीस पेठच्या ग्रामीण रुग्णालयात आणणे पूर्वीच मृत्यु झाल्याची घटना घडली असून मृताची ओळख अद्याप पर्यंत पटलेली नसल्याने या बाबत कुणास माहीती असल्यास त्याची माहीती देण्याचे अवाहन पेठ पोलीसांकडून करण्यात आले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या