Sunday, May 18, 2025
Homeनगरदुचाकी चोरीचे सत्र थांबेना!

दुचाकी चोरीचे सत्र थांबेना!

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

- Advertisement -

कोतवाली व तोफखाना हद्दीतून तीन दुचाकी चोरीला गेल्याच्या फिर्यादी ठाण्यात दाखल झाल्या आहेत. सावेडी उपनगरातील सोनानगर चौक येथे राहणारे सोनार सुधीर उमाकांत कुलथे (वय 52) यांची दुचाकी त्यांच्या घरासमोरून चोरीला गेली. 17 फेब्रुवारीला रात्री ही घटना घडली. त्यांनी दुचाकी हॅन्डल लॉक करून पार्क केली होती. तरीही चोरट्याने दुचाकी चोरून नेली. कुलथे यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.

कायनेटिक चौकाजवळ असलेल्या रविश कॉलनीमधून दुचाकी चोरीला गेली आहे. याप्रकरणी प्रकाश प्रभाकर कांबळे (वय 26 रा. चिलेखनवाडी ता. नेवासा, हल्ली रा. रविश कॉलनी) यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. प्रकाश कांबळे हे खासगी नोकरीला आहेत. ते रविश कॉलनीमध्ये राहुल गोविंद काजळे यांच्याकडे भाड्याच्या घरात राहतात. त्यांनी त्यांची दुचाकी घरासमोर उभी केली होती. अज्ञात चोरट्याने ती चोरून नेली. कांबळे यांच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. स्वस्तिक बसस्थानक परिसरात उभी केलेली दुचाकी चोरीला गेली आहे. याप्रकरणी देविदास महादेव वीरकर (वय 29 रा. शाहूनगर, केडगाव) यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी त्यांची दुचाकी स्वस्तिक बसस्थानकातील प्रसाधनगृहासमोर उभी केलेली होती. अज्ञात चोरट्याने ती चोरून नेली. वीरकर यांच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान दुचाकी चोरीला जाण्याच्या घटना वाढत असताना शहर पोलिसांकडून चोरट्यांचा बंदोबस्त करण्यासाठी कोणत्याही हालचाली होताना दिसत नाही. दुचाकी चोरी करणार्‍या टोळ्यांचा शोध लावण्यात पोलिसांना अपयश आले आहेत. यामुळे दररोज नगर शहरातून दुचाकी चोरीला जात आहेत.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Ahilyanagar : पावसाची आकडेवारी चार दिवसांपासून गायब

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar गेल्या आठ दिवसांपासून अहिल्यानगर जिल्ह्यात भाग बदलत अवकाळी पावसाचा कहर सुरू आहे. अनेक तालुक्यात वादळासोबत जोरदार पर्जन्यवृष्टी झालेली आहे. मात्र, कोणत्या तालुक्यात...