Wednesday, January 7, 2026
Homeब्रेकिंग न्यूजबसच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

बसच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

दिंडोरी । प्रतिनिधी Dindori

- Advertisement -

सुरगाणा तालुक्यातील खुंटविहीर येथील दिंडीचीबारीत दुचाकीला बसच्या मागील बाजूने धडक बसून अपघातात दुचाकी चालक जागीच ठार झाला. याबाबत मयताचा भाऊ राजू गावित याने चालका विरुद्ध फिर्याद दिली आहे.

YouTube video player

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नाशिक ते खुंटविहीर बस क्र.एम.एच १४,बी.टी ३३३९ सुरगाणा येथून खुंटविहीर येथे रात्री सव्वा आठच्या सुमारास दिंडीचीबारी हा घाट चढत असतांना त्या पाठोपाठ मागून दुचाकी क्र. एम. एच १५,जीयू ६३५८ वरील चालक मयत भास्कर लक्ष्मण गावित वय ४० रा. रानविहीर हा घाटातून जात होता.

बारीतील रस्ता एकदम अरुंद असल्याने बसची मागील बाजू दुचाकीला धडकली त्यात दुचाकी चालकाच्या डोक्याला जोरदार फटका बसल्याने नाका तोंडातून रक्तस्त्राव झाला .त्यास तात्काळ सुरगाणा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय तपासणी केली असता मृत घोषित करण्यात आले.मयत भास्करच्या पश्चात पत्नी, आई, वडील असा परिवार आहे. ऐन दिवाळीत घटना घडल्याने परिसरात शोककळा पसरली आहे.पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत दवंगे हे करीत आहेत.
.
दरम्यान खुंटविहीर दिंडीचीबारी घाटात अरुंद एकेरी वाहतूकीचा रस्ता असून अनेक वेळा या घाटात अपघात झाले आहेत. आतापर्यंत दहा ते बारा जणांना जीव गमवावा लागला आहे. रस्ता रुंदीकरण करावे अशी मागणी ग्रामस्थ बाळू गावित, सुरेश पवार, कांतू चौधरी, देवराम काशिनाथ वार्डे, प्रकाश खिराडी, दिनेश बिरारी, मनोहर गावित, राजू गावित, रमेश गावित, जयवंत राऊत, सिताराम पवार, आनंदा पवार, वसंत वार्डे, रमेश चौधरी, मनोज गावित यांनी केली आहे.

ताज्या बातम्या

Nashik Accident News : चाचडगाव टोलनाक्याजवळ ईरटीका-स्कॉर्पिओचा भीषण अपघात; चौघे जागीच...

0
दिंडोरी | Dindori तालुक्यातील नाशिक-पेठ रस्त्यावरील (Nashik-Peth Road) चाचडगाव टोलनाक्याजवळ (Chachadgaon Toll Plaza) ईरटीका आणि स्कॉर्पिओचा भीषण अपघात (Ertika-Scorpio Accident) झाल्याची घटना घडली आहे. या...