Wednesday, February 4, 2026
Homeब्रेकिंग न्यूजबिबट्याच्या हल्ल्यात दुचाकीस्वार जखमी

बिबट्याच्या हल्ल्यात दुचाकीस्वार जखमी

देवळा | प्रतिनिधी Deola

- Advertisement -

तालुक्यातील वाखारवाडी ता.देवळा येथील अक्षय हिरामण निकम (वय -१९) हा युवक आज सायंकाळी पाच वाजता मोटारसाकयलने चांदवड येथून येत असताना चिंचबारी घाटाच्या पायथ्याशी बिबट्याने अचानक हल्ला केला. यामुळे तो मोटारसायकलवरून खाली पडला. बिबट्याचा प्रतिकार करत असतानाच त्याने जोरजोरात आरडाओरडा केल्याने तेथील येणाऱ्याजाणाऱ्यानी धाव घेतल्याने बिबट्याने काढता पाय घेतला.

YouTube video player

यात अक्षयच्या शरीरावर बिबट्याच्या नखांमुळे जखमा झाल्या असून उपचारासाठी देवळा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे यावरील लस उपलब्ध नसल्याने तातडीने मालेगाव येथे पाठविण्यात आले. वाखारीच्या कापराई व चिंचबारी शिवारात बिबट्यांचा वावर वाढल्याने आणि शेतकऱ्यांवर त्यांचे हल्ले होऊ लागल्याने भीतीचे वातावरण आहे.

या पार्श्वभूमीवर पिंजरे बसविण्याची मागणी होत असून देवळा वनपरिक्षेत्र आधिकारी संतोष जाधव ,वनपाल प्रसाद निकम ,वनरक्षक विजय पगार यांनी स्थळ पाहणी करून रुग्णालयात जखमी युवकास भेट दिली. दरम्यान ,पिंजरा लाऊन बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी वनविभागाकडे करण्यात आली आहे.

ताज्या बातम्या

Nashik News : पाणी व स्वच्छता विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे मानधन रखडले;...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) टप्पा-२ व जल जीवन मिशन अंतर्गत जिल्हा परिषद (Zilla Parishad) स्तरावर कार्यरत असलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे ऑक्टोबर...