Saturday, March 29, 2025
Homeनाशिककारच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू; एक जण गंभीर जखमी

कारच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू; एक जण गंभीर जखमी

नाशिकरोड । प्रतिनिधी Nashikroad

येथील जेलरोड परिसरात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौकासमोर मध्यरात्री तीन वाजेच्या सुमारास भरगाव वेगाने जाणाऱ्या सिटी होंडा कारची दुचाकी गाडी चालकास धडक बसल्याने झालेल्या अपघातात एक जण ठार तर एक जण गंभीर जखमी झाला असून या अपघात प्रकरणी नाशिक रोड पोलीस ठाण्यात कार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

याबाबतचे वृत्त असे की मोहन बाळू गायकवाड वय 36 व स्वप्नील दीपक गायकवाड हे दोघेजण बुधवारी मध्यरात्री तीन वाजेच्या सुमारास जेलरोड येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौकासमोरून आपली दुचाकी हिरो होंडा गाडी क्रमांक एम एच 15 डीजे 87 78 या गाडीवर जात होते याच दरम्यान नाशिक रोड कडून नांदूर नाक्याकडे भर गाव वेगाने सिटी होंडा कार क्रमांक एम एच 0 1 A x 3760 ही गाडी जात असताना सदर गाडीची दुचाकीला जोरदार धडक बसल्याने या अपघातात मोहन बाळू गायकवाड हे ठार झाले तर स्वप्निल दीपक गायकवाड हे गंभीर जखमी झाले.

अपघाताचे वृत्त समजतात वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके व त्यांचे सहकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक काळे हे अपघात स्थळी दाखल झाले व त्यांनी तातडीने जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले दरम्यान या अपघात प्रकरणी नितीन बाळू गायकवाड राहणार अनुसया नगर खरजुल मळा सिन्नर फाटा नाशिक रोड यांनी फिर्याद दाखल केली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक काळे हे करत आहे. या अपघातात जखमी झालेले पोलीस कर्मचारी स्वप्निल गायकवाड उपनगर पोलीस ठाण्यात कार्यरत असून अहमदनगर येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेचा बंदोबस्त आटोपून ते नाशिक रोड येथे येऊन घरी जात असताना हा अपघात घडला.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik : ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

0
नाशिकरोड | प्रतिनिधी Nashikroad नाशिक-पुणे महामार्गावर असलेल्या गांधीनगर जवळील विजय ममता चित्रपटगृहाजवळ ट्रॅक्टरची वाहतूक करणाऱ्या ट्रकची एका तरुणाला जोरदार धडक बसल्याने झालेल्या अपघातात एक युवक...