Friday, October 18, 2024
Homeदेश विदेशतुमच्या मुलांचं आधार कार्ड अपडेट करायचंय? इथे करा क्लिक

तुमच्या मुलांचं आधार कार्ड अपडेट करायचंय? इथे करा क्लिक

नवी दिल्ली | वृत्तसंस्था | New Delhi

प्रत्येक वयोगटासाठी आधार कार्ड (Aadhaar Card) अतिशय महत्वाचे कागदपत्र (Documents) आहे. नवजात बाळांचेदेखील (Newborn babies) आधार कार्ड बनवले जाते…

- Advertisement -

आई-वडिलांच्या आधार कार्ड आणि बर्थ डिस्चार्ज सर्टिफिकेट (Birth discharge certificate) द्वारे नवजात बाळांचे आधार कार्ड बनविण्यात येते.

या आधार कार्डला कालांतराने अपडेट (Update) करणे गरजेचे असते. मुलांच्या 5 वर्षानंतर आधार कार्डमध्ये बायोमेट्रिक अपडेट (Biometric update) करावे. हे अपडेट केले नाही तर मुलांचे आधार कार्ड इनअ‍ॅक्टिव्ह (Inactive) होण्याची शक्यता असते. याबाबत UIDAI ने ट्विटद्वारे माहिती दिली आहे.

5 वर्षानंतर मुलांच्या आधार कार्डचे बायोमेट्रिक अपडेट केले नाही तर ते आधार कार्ड इनअ‍ॅक्टिव्ह होते. तसेच मुले 15 वर्षांची झाल्यानंतर पुन्हा एकदा बायोमेट्रिक अपडेट करणे आवश्यक असते.

मुलांचे बायोमेट्रिक अपडेट करणे पूर्णपणे मोफत आहे. यासाठी कोणतेही शुल्क भरावे लागत नाही. आधार एनरोलमेंट सेंटरवर (Aadhaar Enrollment Center) जाऊन बायोमेट्रिक अपडेट करावे लागते.

अशी करा अपॉईंटमेंट बुक

अपडेटची अपॉईंटमेंट बुक (Appointment book) करण्यासाठी appointments.uidai.gov.in/easearch.aspx वर क्लिक करा. नंतर Book an appointment वर क्लिक करा. डिटेल्स भरुन Proceed to appointment वर क्लिक करा. डिटेल्स वेरिफाय (Verify) करा आणि अपॉईंटमेंट बुकसाठी सबमिटवर (Submit) क्लिक करा. नंतर सर्व कागदपत्रांसह आधार एनरोलमेंट सेंटरवर जावे लागेल.

- Advertisment -

ताज्या बातम्या