Friday, September 11, 2026
Homeनगरअजय महाराज बारस्करांना मारहाण, दोघे ताब्यात

अजय महाराज बारस्करांना मारहाण, दोघे ताब्यात

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

बोल्हेगाव येथील अजय महाराज बारस्कर यांना गुरूवारी रात्री घरी येऊन दोन तरुणांनी शिवीगाळ करीत मारहाण केली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी तात्काळ मारहाण करणार्‍यांना ताब्यात घेतले आहे. याबाबत रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. दरम्यान, अजय महाराज बारस्कर यांनी मनोज जरांगे यांच्यावर आरोप केले होते. यावरून मारहाण झाली का? याचा तपास पोलीस करत आहेत. अजय महाराज बारस्कर यांचे बोल्हेगाव फाटा येथे घर आहे. गुरूवारी सातच्या सुमारास दोन तरुण घरी आले.

- Advertisement -

घरातील महिलांना शिवीगाळ करू लागले. त्यांनी महिलांनाही मारहाण केली. त्याचवेळी अजय महाराज बारस्कर घरी गेले असता त्या दोघांनी बारस्कर महाराज यांनाही पाईपने मारहाण केली. ही घटना एमआयडीसी पोलिसांना समजताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मारहाण करणार्‍या दोघांना ताब्यात घेतले. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. याबाबत सहायक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी म्हणाले, की अजय महाराज बारस्कर यांना मारहाण करणार्‍या दोघांना ताब्यात घेतले असून, गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.

ताज्या बातम्या

संपादकीय : ११ सप्टेंबर २०२६ – विद्यार्थ्यांचा आक्रोश कोणी ऐकेल काय?

0
महाराष्ट्राची शैक्षणिक पंढरी म्हणून ओळखल्या जाणार्‍या पुणे शहरासह संपूर्ण राज्यामध्ये आज स्पर्धा परीक्षांच्या पेपरफुटीमुळे एक अभूतपूर्व आणि चिंताजनक जनक्षोभ उसळला आहे. नीट परीक्षेपासून सुरू...