Saturday, May 18, 2024
Homeनाशिक'नकुशी' झाली 'हवीशी'! आदिवासी बहुल इगतपुरीत वाढला 'ती'चा जन्मदर

‘नकुशी’ झाली ‘हवीशी’! आदिवासी बहुल इगतपुरीत वाढला ‘ती’चा जन्मदर

बेलगाव कुऱ्हे | लक्ष्मण सोनवणे | Belgaon Kurhe

‘पहिली बेटी-धनाची पेटी’ हे ब्रीदवाक्य घरोघरी ऐकायला मिळत आहे. वंशाचा दिवा म्हणजे मुलगाच (Son) ही बुरसटलेली मानसिकता मागे टाकत आता घरोघरी मुलींच्या जन्माचे स्वागत होऊ लागले आहे…

- Advertisement -

इगतपुरी तालुक्यात (Igatpuri Taluka) मुलांच्या तुलनेत मुलींचे (Daughter) प्रमाण वाढल्याची शुभवार्ता आहे. १ हजार मुलांमागे ९५० मुली हा जन्मदर समाजस्वास्थाच्या व वैद्यकीय दृष्टिकोनातून महत्त्वाचा निर्देशांक मानला जातो.

सोनोग्राफीमध्ये लिंगपरीक्षण बंदी, पीसीपीएनडीटी कायद्याची कडक अंमलबजावणी तसेच सामाजिक जनजागृती यामुळे मुलींचा जन्मदर वाढण्यास मदत झाल्याचे निरीक्षण सामाजिक व वैद्यकीय क्षेत्रातून व्यक्त होत आहे.

…अखेर अनुराधा सिनेमागृह जमीनदोस्त; जाणून घ्या ४७ वर्षांचा इतिहास

तालुक्यातील मुलींचा जन्मदर वर्षभरात १२ हजार १६२ तर मुलांचा जन्मदर १३ हजार १६२ इतका झाला असल्याची माहिती इगतपुरीचे बालविकास प्रकल्प अधिकारी पंडित वाकडे (Pandit Wakde) यांनी दिली.

जुन्या विचारसरणीत नकोशा झालेल्या मुलींची गर्भातच हत्या होत होती परंतु आजच्या बदलत्या काळात माता जिजाऊंची प्रतिमा मुलींमध्ये पाहत मुलींच्या जन्माचे स्वागत आणि परीपूर्ण संगोपणावर भर दिला जात आहे.

तालुक्यात एकुण मुलींची संख्या १८ हजार ४५ इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत शिक्षण घेत असलेल्या मुलींची संख्या १७ हजार ९३७ असल्याची सुवार्ता इगतपुरीचे गटशिक्षण अधिकारी निलेश पाटील (Nilesh Patil) यांनी दिली. तालुक्यात अनेक भागांमध्ये मुलींच्या जन्माचे स्वागत होऊ लागल्याने मुलगी ‘नकोशी’ या विचाराला इगतपुरीकरांनी मूठमाती दिली आहे.

मार्केट यार्डसमोर वडाचे झाड कोसळले; महिलेला वाचवले, मदतकार्य सुरु

समाजिक प्रबोधनातून स्री-भृणहत्या रोखणे, मुलींच्या जन्माबाबत समाजामध्ये सकारात्मक विचार आणणे, बालविवाह रोखणे आणि मुलां इतकाच मुलींचा जन्मदर वाढविणे या उद्देशाने आमचे काम सुरू असून धामणगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात गेल्या तीन महिन्याचा जन्मदर मुले 62 मुली 56 असाजन्मदर वाढल्याची सुवार्ता आहे.सामाजिक संस्थांचा वाढता सहभाग, ‘बेटी बचाओ-बेटी पढाओ’अंतर्गत मुलींचे स्वावलंबन, पोषणाबाबतची जनजागृती, चांगल्या आरोग्य सुविधा यामुळेही मुलींच्या जन्मदर वाढीस चालना मिळत आहे.

– संदीप वेढे, वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र धामणगाव

केंद्र शासनाने “बेटी बचाओ-बेटी पढाओ” ही योजना सुरू केली आहे. याच धर्तीवर मुलींच्या जन्माबाबत समाजामध्ये सकारात्मक विचार आणने आणि मुलांइतकाच मुलींचादेखील जन्मदर वाढविणे, त्यांना शिक्षण देणे महत्वाचे आहे. सूज्ञ पालक सकारात्मक पाऊले उचलताना दिसत आहेत तसेच ही बदलती मानसिकता टिकवून ठेवण्यासाठी आम्हीही आमच्या परीने पूर्ण प्रयत्नांसह कटिबध्द आहोत. मुलगा-मुलगी एकसमान यातून शिक्षणाचे महत्त्व पटल्याने पालकांमध्ये जनजागृती होताना दिसून येत आहे.

– विद्या पाटील, महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षिका पुरस्कार प्राप्त, वाकी शाळा

- Advertisment -

ताज्या बातम्या