नाशिक | Nashik
संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत. यात राज्याच्या सत्तेच्या चाव्या पुन्हा एकदा महायुतीच्या हातात गेल्या आहेत. त्यामध्ये नाशिक जिल्ह्यातील बहुतांश आमदारांनी देखील पुन्हा एकदा आमदार होण्याचा बहुमान मिळाला आहे.
यात भाजपतून नाशिक जिल्ह्यातील पहिला निकाल हाती आला होता. त्यात नाशिक पश्चिमतून सीमा हिरे विजयी झाल्या होत्या. यानंतर आता भाजपचा दुसरा निकाल हाती आला तेव्हा बागलाणमधून दिलीप बोरसे विजयी झाले होते. यानंतर आता भाजपचा तिसरा निकाल हाती आला असून नाशिक मध्यतून देवयानी फरांदे सलग तिसऱ्यांदा विजयी झाल्या आहेत.
देवयानी फरांदे १७ हजार ८३५ मतांनी विजयी झाल्या असून त्यांनी महाविकास आघाडीच्या ठाकरे गटाचे उमेदवार वसंत गीते यांचा पराभव केला. वसंत गीते यांना ८७ हजार १५१ मते मिळाली आहेत. त्यामुळे देवयानी फरांदे यांचा विजय निश्चित झाला आहे.