Monday, November 25, 2024
Homeब्लॉगभारतीय संस्कृतीचे निस्सीम उपासक डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी

भारतीय संस्कृतीचे निस्सीम उपासक डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी

भारतीय संस्कृतीचे निस्सीम उपासक डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांचा आज जन्मदिवस! त्यानिमित्त त्यांचा अल्प परिचय…

डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी हे भारतीय संस्कृतीचे निस्सीम उपासक, थोर शिक्षणतज्ञ, भारतीय जनसंघाचे संस्थापक, लोकशाही संकेताचे भाष्यकार, अव्दितीय संसदपटू आणि काश्मिरच्या बलिवेदीवर प्राणांची आहुती देणारे भारतमातेचे थोर सुपुत्र! मुखर्जी यांचा जन्म ६ जुलै १९०१ रोजी कोलकात्याला एका प्रतिभावंत परिवारात झाला. त्यांचे वडील आशुतोष मुखर्जी! त्यांना सरस्वतीपुत्र म्हणत.

- Advertisement -

डॉ.मुखर्जी लहानपणी शिक्षण घेत असताना वर्गावर शिक्षक येण्याअगोदर त्यांच्या बरोबरच्या मुलांना शिक्षणाचे धडे देत. १९१७ साली ते मॅट्रिक पास झाले. १९२३ साली त्यांनी पदवी शिक्षण पूर्ण केले. नंतर ते उच्चशिक्षणासाठी इंग्लंडला गेले. तेथे त्यांनी बॅरिस्टर ही पदवी प्राप्त केली. १९२६ मध्ये ते मायदेशी परतले. कोलकात्याच्या विश्वविद्यालयाचे वयाच्या ३३ वर्षी ते कुलगुरु झाले. हिंदूंच्या हिताला प्राधान्य देणार्‍या राजकीय व सांस्कृतिक संघटनाच या देशाचे खरे कल्याण करू शकतील, या स्वा.सावरकरांच्या आणि डॉ. हेडगेवार यांच्या विशुध्द विचारसरणीचा प्रभाव डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्यावर पडला. त्यामुळेच कोलकाता येथील हिंदू महासभेच्या अधिवेशनात डॉ.श्यामाप्रसादांनी अतीव हिरिरीने व तळमळीने भाग घेतला. हिंदू महासभेचे उपाध्यक्ष म्हणून त्यांची या अधिवेशनात निवड झाली. या पदावरून त्यांनी केलेले राष्ट्रजागृतीचे प्रभावी कार्य देशात नवचैतन्य निर्माण करणारे ठरले.

सरसंघचालक गोलवलकर गुरुजी यांच्या मार्गदर्शनांनी डॉ. मुखर्जी यांनी राजकीय क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली. २१ ऑक्टोबर १९५१ ला त्यांनी भारतीय जनसंघाची स्थापना केली. भारताच्या पहिल्या मंत्रिमंडळात ते उद्योगमंत्री म्हणून सामिल झाले. त्यांनी सर्व प्रथम देशहितासाठी चित्तरंजन लोकोमोटिव्ह, सेंद्रीय फर्टिलायझर, हिंन्दुस्थान एअरक्राफ्टसारखे कारखाने सुरु केले.

काश्मीर संबंधित ३७०, ३५ अ ही कलमे देशविघातक आहेत, ती रद्द झालीच पाहिजेत व अखंड भारत राहावा यासाठी त्यांनी अहोरात्र कार्य केले. त्यांनी काश्मीरच्या एका सभेत ‘एक देश में दो निशान, दो विधान, दो प्रधान, नही चलेंगे’ असा नारा दिला.

तेव्हा काश्मीरला जाण्यासाठी पारपत्र लागत असे. ते डॉ. मुखर्जी यांना मंजूर नव्हते. म्हणून ते विनापारपत्र काश्मीरमध्ये गेले. तत्कालिन सरकारने त्यांना सभेतून २३ जून १९५३ रोजी तुरुंगात टाकले व तेथेच त्यांचा संशयास्पद मृत्यु झाला. त्यांच्या स्मरणार्थ भाजप हा दिवस बलिदानदिन म्हणून पाळतो. आजच्या बलिदान दिनानिमित्ताने त्यांच्या विचारानुसार आपण पक्षाचे काम एकनिष्ठेने करूया. हीच डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांना श्रध्दांजली!

– रामहरी सुकदेव संभेराव

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या