दोंडाईचा । Dondaicha । प्रतिनिधी
शिंदखेडा (Shindkheda) येथील काँग्रेसचे (Congress) उदय देसले, मिरा मनोहर पाटील, संगिता चंद्रकांत सोनवणे या विद्यमान 3 नगरसेवकांनी तर माजी नगरसेवक (Corporator) गणेश सोनवणे यांनी त्यांच्या सुमारे दोनशे समर्थकांसह माजी मंत्री आ. जयकुमार रावल यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये (BJP) प्रवेश केला. हा स्थानिक काँग्रेससाठी मोठा धक्का (shock) असल्याचे मानले जाते आहे.
नगरपंचायतीच्या गेल्या निवडणुकीत काँग्रेसला सहा जागा मिळाल्या होत्या. तर राष्ट्रवादी काँग्रेसला एकही जागा मिळाली नव्हती. काँग्रेसच्या 6 पैकी 3 नगरसेवकांनी भाजपा प्रवेश केल्याने शहरात भाजपची परिस्थिती मजबूत झाली आहे. या प्रवेशाने स्थानिक काँग्रेस पूर्णपणे कमकुवत झाली आहे.
यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष नारायण पाटील, कामराज निकम, नगराध्यक्षा रजनीताई वानखेडे, गटनेते अनिल वानखेडे, उपनगराध्यक्ष प्रकाश देसले, गोरख पाटील, माजी उपनगराध्यक्ष उल्हास देशमुख, भिला पाटील, अशोक देसले, युवराज माळी, नगरसेवक बबन सकट, अॅड. विनोद पाटील, चेतन परमार, जितेंद्र जाधव, अर्जुन सोनवणे, विद्यार्थी आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुरज देसले, शिंदखेडा शहराध्यक्ष प्रवीण माळी आदी उपस्थित होते.
यावेळी आ.रावल म्हणाले, मागील सत्तेच्या काळात शिंदखेडा शहर व मतदार संघात जो काही विकास झाला आहे त्याला प्रभावित होवून अनेक जण भाजपासोबत येत आहेत. आगामी काळात संपूर्ण मतदारसंघ काँग्रेसमुक्त होवून भाजपामय होणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
प्रवेश करणार्यांमध्ये माजी नगरसेवक गणेश भिल, माजी ग्राप सदस्य संजय भामरे, श्रीमंत प्रताप पाटील तसेच वरसुसचे विजय भाऊराव पाटील यांच्यासह सुमारे 200 कार्यकर्त्यांचा समावेश आहे.