Tuesday, May 20, 2025
Homeदेश विदेश"राहुल गांधी हे नव्या युगाचे मीर जाफर..."; भाजपाचे राहुल गांधीवर जोरदार टीकास्र

“राहुल गांधी हे नव्या युगाचे मीर जाफर…”; भाजपाचे राहुल गांधीवर जोरदार टीकास्र

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तानातील दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. एकीकडे, सरकार या ऑपरेशनच्या यशाबद्दल देशात आणि परदेशात मोहीम राबवत आहे, तर दुसरीकडे काँग्रेस नेते राहुल गांधी या कारवाईचा तपशील मागत आहे. अशातच आता भाजपने राहुल गांधी यांची तुलना पाकिस्तानच्या लष्कर प्रमुख असीम मुनीर यांच्याशी केली आहे.

- Advertisement -

ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख करत भाजप आयटी सेलचे अध्यक्ष अमित मालवीय यांनी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना टार्गेट केले असून त्यांच्यावर टीका केली आहे. अमित मालवीय यांनी त्यांच्या X अकाउंटवर एक फोटो पोस्ट केला असून राहुल गांधी पाकिस्तानची भाषा बोलत असल्याचा आरोप केला आहे.

काय म्हंटले आहे अमित मालवीय?
भाजप आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी एका एक्स पोस्टमध्ये म्हटले की, राहुल गांधी पाकिस्तानची भाषा बोलत आहेत, यात आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही. ऑपरेशन सिंदूरच्या यशाबद्दल त्यांनी पंतप्रधानांचे अभिनंदन केले नाही, त्याऐवजी वारंवार ‘किती विमाने गमावली’ असा प्रश्न विचारत आहेत. डीजीएमओच्या ब्रीफिंगमध्ये आधीच याची सविस्तर माहिती देण्यात आली आहे.

या संघर्षादरम्यान किती पाकिस्तानी विमाने पाडली किंवा नष्ट केली, हे शोधण्याचा राहुल गांधींनी एकदाही प्रयत्न केला नाही. राहुल गांधींना पुढे काय मिळणार? निशाण-ए-पाकिस्तान? या पोस्टसोबत मालवीय यांनी एक फोटोही पोस्ट केला आहे. यामध्ये पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीर यांचा अर्धा चेहरा आणि राहुल गांधींचा अर्धा चेहरा दिसत आहे. दुसऱ्या एका पोस्टमध्ये ते म्हणतात की, राहुल गांधी हे नव्या युगाचे मीर जाफर आहेत, अशी बोरची टीकाही अमित मालवीय यांनी केली.

राहुल गांधी काय म्हणाले होते?
राहुल गांधी यांच्या प्रतिक्रियेचा एक व्हिडिओ शेअर करत राहुल गांधी यांनी त्यांच्यावर दोन दिवसांपूर्वी टीका केली होती. ते म्हणाले होते, ऑपेरशनच्या सुरुवातीलाच पाकिस्तानला कळवणे हा गुन्हा आहे. परराष्ट्र मंत्र्यांनीच जाहीर केलेय की भारत सरकारने पाकिस्तानला सांगितले होते. त्यांना कोणी अधिकार दिला? पाकिस्तानला कळवल्यामुळे आपण किती भारतीय विमाने गमावली? असाही प्रश्न त्यांनी विचारला. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांचे मौन निंदनीय आहे. मी पुन्हा विचारेन की पाकिस्तानला या हल्ल्याविषयी माहिती होती, त्यामुळे आपण आपले किती भारतीय विमाने गमावली आहेत? ही चूक नाहीय तर हा गुन्हा आहे. त्यामुळे देशाला खरे काय ते कळले पाहिजे” असे राहुल गांधी म्हणाले होते. यानंतर आता पाकिस्तान आणि राहुल गांधी यांचा अजेंडा एकच असल्याची टीका भाजपने केली आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या