Tuesday, May 7, 2024
Homeनाशिकनाशकात भाजपला 'दे धक्का'; बड्या नेत्याचा आज ठाकरे गटात प्रवेश

नाशकात भाजपला ‘दे धक्का’; बड्या नेत्याचा आज ठाकरे गटात प्रवेश

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी सरकार स्थापन केल्यानंतर अनेक नगरसेवक, आमदार, खासदारांनी ठाकरे गटाला रामराम ठोकत शिंदे गटात प्रवेश केला आहे. मात्र नाशिकमध्ये ठाकरे गटाने भाजपला मोठा धक्का दिल्याचे चित्र आहे…

- Advertisement -

भाजप नेते अद्वय हिरे यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली असून ते आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश करणार आहेत. अद्वय हिरे हे नाशिक जिल्ह्यातील भाजपचे महत्त्वाचे नेते असून, ते जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष देखील आहेत.

अद्वय हिरे यांनी नुकतीच ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर जाऊन भेट घेतली होती. त्यानंतर ते आज चार वाजता उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थित शिवसेना भवन येथे ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत.

आता अद्वय हिरे हे ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याने हा भाजपसाठी मोठा धक्का तर ठाकरे गटासाठी दिलासा मानला जात आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या