Tuesday, May 28, 2024
Homeमुख्य बातम्याKirit Somaiya : आक्षेपार्ह Video वर किरीट सोमय्यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

Kirit Somaiya : आक्षेपार्ह Video वर किरीट सोमय्यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

मुंबई | Mumbai

भाजपचे नेते डॉ. किरीट सोमय्या यांचा कथित व्हिडिओ व्हायरल झाल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली. याबाबत एका मराठी वृत्तवाहिनीने वृत्त देखील प्रसारीत केलं आहे. सोमय्यांबाबतचे हे वृत्त प्रसारित झाल्यानंतर अनेक राजकीय नेत्यांनी आता संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. दरम्यान, व्हिडीओ प्रसारित होताच किरीट सोमय्या यांनी ट्वीट करत देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहलं आहे. या प्रकरणी चौकशीची मागणी करणारं पत्र सोमय्या यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लिहीलं आहे.

- Advertisement -

“देवेंद्रजी, आज सायंकाळी एका मराठी वृत्तवाहिनीवर माझी एक व्हिडीओ क्लिप प्रदर्शित करण्यात आली. या निमित्ताने अनेक व्यक्तींनी माझ्यावर अनेक आरोप केले, आक्षेप घेतले आहेत. अशाप्रकारच्या अनेक व्हिडीओ क्लिप्स उपलब्ध आहेत, असेही सांगण्यात आले आहे. मी अनेक महिलांवर अत्याचार केले, अनेक महिलांच्या तक्रारी आल्या आहेत आणि त्याच्या अनेक व्हिडीओ क्लिप आहेत, असेही दावे केले जात आहेत. तथापि माझ्याकडून कोणत्याही महिलेवर असा अत्याचार झालेला नाही, हे मी याठिकाणी स्पष्ट करतो. त्यामुळे अशा सर्व आरोपांची आपण चौकशी करावी” असं पत्रात किरीट सोमय्या म्हणाले आहेत.

दरम्यान विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी किरीट सोमय्या यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. “किरीट सोमय्या यांच्याबाबत माझ्याकडे अनेक तक्रारी आल्या आहेत. आपण हा विषय योग्य व्यासपीठावर मांडणार आहोत. माझ्यासाठी तक्रार करणाऱ्या महिलांची सुरक्षा महत्वाची आहे” असं अंबादास दानवे म्हणाले. अंबादास दानवे ठाकरे गटाचे आमदार आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या