मुंबई | Mumbai
सर्वोच्च न्यायालयाचा निकालानंतर आता भाजप आक्रमक झाला आहे. ठाकरे सरकाविरोधात एकामागे एक टि्वट करत भाजप आमदार आशिष शेलार यांनी पुन्हा एकदा ठाकरे सरकारला घेरले आहे.
अखेर पदवी परीक्षांचे कोडे सुटले असून आज सर्वोच्च न्यायालयाने महत्वपूर्ण निकाल दिला आहे. यावरूनच भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी ट्विट करत महाराष्ट्र सरकारवर जहरी टीका केली आहे. शेलार यांनी ट्विट करत म्हंटले आहे की,”कुलपती म्हणून मा.राज्यपालांना, कुलगुरूंना विश्वासात घेतले नाही.. शिक्षण तज्ञांची मते घुडकावली…युजीसीला जुमानले नाही… मंत्री मंडळात चर्चा केली नाही… विद्यार्थ्यांना अखेर पर्यंत वेठीस धरले.. अहंकारातून विद्यार्थ्यांचे एवढे महिने नुकसान केले…काय साध्य केले?”
तसेच “का “बबड्याच्या” हट्टापायी राज्यातील 10 लाख विद्यार्थ्यांना नाहक मानसिक त्रास दिला…त्यांच्या शैक्षणिक वर्षाचा खेळखंडोबा केला… आम्ही या निर्णयाचे धोके वारंवार सांगत होतो पण.. अहंकार…! ऐकतो कोण? मा. सर्वोच्च न्यायालयाने अखेर न्याय दिला!” असा टोला देखील त्यांनी आदित्य ठाकरे यांना लगावला आहे.
तसेच “महाराष्ट्रातील ‘पाडून दाखवा सरकारने’ स्वतःच्या अहंकारातून स्वतःच तोंडावर पडून दाखवले!” अशी जहरी टीका त्यांनी महाराष्ट्र सरकारवर केली आहे.