Thursday, March 13, 2025
Homeजळगावअल्पसंख्याक, मागासवर्गीयांच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचविणार - धनंजय चौधरी

अल्पसंख्याक, मागासवर्गीयांच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचविणार – धनंजय चौधरी

रावेर। प्रतिनिधी –

महाविकास आघाडीचे धोरण उपेक्षित घटकांना न्याय देण्याचे आहे. अल्पसंख्यांक तसेच मागासवर्गीय जनतेच्या हिताच्या अनेक योजना सरकारतर्फे राबविण्यात येतात. मात्र या योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहचत नसल्याने या समाज घटकाचा खर्‍या अर्थाने विकास झालेला नाही. रावेर मतदार संघातील अल्पसंख्यांक व मागासवर्गीयांच्या शेवटच्या माणसापर्यंत या योजना पोहचवून त्यांच्या उन्नतीसाठी भावी काळात आपण प्रयत्नशील राहू असे आश्वासन रावेर मतदार संघातील महाविकास आघाडीच्या कॉँग्रेसचे उमेदवार धनंजय चौधरी यांनी दिले.

- Advertisement -

रावेर मतदार संघातून महाविकास आघाडीच्या कॉँग्रेस पक्षातर्फे निवडणूक लढवणार्‍या धनंजय चौधरी यांनी रविवारी यावल तालुक्यातील भोरटेक, पाडळसा, बामनोद, डोंगरकठोरा, सातोद, कोळवद व यावल येथे प्रचार दौरा करीत मतदारांशी संवाद साधला. त्यावेळी सर्व समाज घटकांना योग्य न्याय मिळाला पाहिजे व त्यामाध्यमातून समाजाचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे ही माझी भूमिका आहे. शासकीय योजनांपासून कोणताही घटक उपेक्षित राहणार नाही. यासाठी भावीकाळात आपण काम करणार असल्याचे धनंजय चौधरींनी सांगितले.

यावल तालुक्यातील प्रचार दौर्‍यात उमेदवार धनंजय चौधरी यांच्यासोबत यावल तालुकाध्यक्ष प्रभाकर आप्पा सोनवणे, राष्ट्रवादी यावल तालुकाध्यक्ष मुकेश येवले, शेतकी संघाचे माजी चेअरमन अमोल भिरूड, अरमान तडवी, सुरेश चौधरी वड्री, यावलचे गनीभाई, माजी पंचायत समिती सदस्य यावल धनुभाऊ बर्‍हाटे, माजी पंचायत समिती सदस्य विलास तायडे, पाडळसा सरपंच सुरज पाटील, माजी सरपंच यशवंत ब-हाटे, ग्रामीण शिक्षण संस्था अध्यक्ष डॉ. उदय चौधरी, विजय पाटील, सिताराम कोळी, बापू कोळी, अरुण चौधरी, राजू पठाण, ज्ञानदेव बेंडाळे, शेखर तायडे, राजू बेंडाळे, भोरटेक येथील विजय कोळी, शामराव कोळी, विनोद कोळी, भूषण कोळी, जितेंद्र कोळी, किशोर कोळी, सचिन कोळी, दीपक कोळी, रवींद्र कोळी, रामचंद्र कोळी, बामनोदचे सरपंच राहुल तायडे, उपसरपंच तुषार जावळे, ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत राणे, गोपाळ जावळे, शेखर कोल्हे, सुनील केदारे, शेखर नेहते, रमेश येवले, माजी सरपंच दिलीप बाविस्कर, हितेश फिरके, रमेश सोनवणे, प्रमोद बोरोले, राजेंद्र राणे, प्रभाकर झोपे, नितीन झांबरे, अमोल येवले, दिनकर भंगाळे, जयेश पाटील, प्रवीण नेहते, यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Dadasaheb Khindkar : धनंजय देशमुखांचा साडू पोलिसांना शरण; तरुणाला केली होती...

0
मुंबई | Mumbai मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर बीड येथील मारहाणीचे विविध व्हिडीओ व्हायरल होत आहेत. सगळ्यात आधी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांना (Santosh Deshmukh) मारहाण...