मुंबई | Mumbai
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची (Ajit Pawar Group) काल (दि.२७) रोजी आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Vidhansabha Election) पार्श्वभूमीवर मुंबईत महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत बोलताना पक्षाचे ज्येष्ठ नेते व मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी महायुतीत (Mahayuti) अजित पवार गटाला विधानसभेच्या निवडणुकीत ८० ते ९० जागा देण्याचा शब्द दिला असल्याचे विधान केले होते. त्यांच्या या विधानानंतर महायुतीमध्ये नाराजीचा सूर पसरला असून भाजप नेते आणि माजी खासदार निलेश राणे यांनी भुजबळांबाबत मनातील खदखद व्यक्त केली आहे.
हे देखील वाचा : महायुतीत मिठाचा खडा? भुजबळांच्या ‘त्या’ विधानावरून सेना-भाजप नेत्यांमध्ये नाराजी
निलेश राणे (Nilesh Rane) यांनी एक्स (पूर्वीचे ट्विटर) अकाउंटवरून पोस्ट करत भुजबळ यांच्यावर टीका केली आहे. त्यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे की, “श्री छगन भुजबळांना आवरलं पाहिजे, मी भारतीय जनता पक्षाचा एक लहान कार्यकर्ता असलो तरी आम्ही नेहमी भुजबळांचं का ऐकून घ्यावं? असा सवाल राणे यांनी केला. तसेच मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन सुरू असताना सुद्धा आम्ही त्यांची बाजू घेतली नाही. भुजबळ नेहमी बीजेपीला डिवचत असतात त्यांची ही भूमिका बरोबर नाही”, असे राणेंनी म्हटले.
तसेच निलेश राणे यांनी पोस्टमध्ये पुढे म्हटले की, ” आम्हाला असंच पाहिजे आम्हाला तसंच पाहिजे, युती आघाड्या करून ही भाषा एका नेत्याला शोभत नाही. आम्ही तुमच्या वयाचा आदर करतो पण उठ सूट कोण युती बिघडवायची भाषा बोलत असेल तर सहन होत नाही आणि होणार नाही. कारण भारतीय जनता पक्षाने सर्वात मोठा पक्ष असून सुद्धा नेहमी सकारात्मक भूमिका ठेवली आहे”, असंही राणे एक्समध्ये म्हणाले आहेत.
हे देखील वाचा : “अजितदादा भाजपला आताच सांगा की, विधानसभेला…”; लोकसभेच्या निकालापूर्वीच भुजबळांची मोठी मागणी