Thursday, September 24, 2026
Homeब्रेकिंग न्यूजBJP Cell Incharge List: भाजपचा ‘मास्टरप्लॅन’! महाराष्ट्रात ३७ प्रकोष्ठांना नवे प्रभारी; पाहा...

BJP Cell Incharge List: भाजपचा ‘मास्टरप्लॅन’! महाराष्ट्रात ३७ प्रकोष्ठांना नवे प्रभारी; पाहा कोणाला कोणती जबाबदारी

मुंबई | प्रतिनिधी
भारतीय जनता पक्षाने संघटनात्मक पातळीवर फेरबदलांचा धडाका कायम ठेवला आहे. केंद्रीय पातळीवर नव्या राष्ट्रीय टीमची घोषणा केल्यानंतर आता महाराष्ट्र भाजपनेही विविध प्रकोष्ठांच्या प्रभारी आणि सहप्रभारींच्या नव्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी २४ ऑगस्ट रोजी ही यादी जाहीर केली. एकूण ३७ प्रकोष्ठांसाठी नवीन जबाबदाऱ्या निश्चित करण्यात आल्या आहेत.

या नियुक्त्यांमध्ये पक्षातील अनुभवी नेत्यांसोबत आमदार, प्रदेश पदाधिकारी आणि विविध क्षेत्रांतील कार्यकर्त्यांना महत्त्वाच्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. त्यामुळे आगामी काळातील पक्षसंघटना मजबूत करण्याच्या दृष्टीने हा फेरबदल महत्त्वाचा मानला जात आहे.

- Advertisement -

विखे-पाटील खासगी आरोग्य विद्यापीठ

कोणाला कोणती जबाबदारी?
भाजपने जाहीर केलेल्या यादीतील प्रमुख नियुक्त्या पुढीलप्रमाणे आहेत:
विधी प्रकोष्ठ – भूषण महाडिक
बुद्धिजीवी प्रकोष्ठ – विश्वास पाठक
उद्योग प्रकोष्ठ – आमदार अरुण लखानी
वैद्यकीय प्रकोष्ठ – डॉ. भारती पवार
सहकार प्रकोष्ठ – आमदार प्रवीण दरेकर
सांस्कृतिक प्रकोष्ठ – आशिष शेलार
शिक्षक प्रकोष्ठ – सुनील लोढा
व्यापार प्रकोष्ठ – किरिट भंसाली
आर्थिक प्रकोष्ठ – मिलिंद कानडे
मच्छिमार प्रकोष्ठ – चेतन पाटील
बुनकर प्रकोष्ठ – मनोज दिवटे
कामगार प्रकोष्ठ – मिलिंद तुळसकर
उत्तर भारतीय प्रकोष्ठ – आर. डी. यादव
भटके-विमुक्त प्रकोष्ठ – गोपीचंद पडळकर
दिव्यांग प्रकोष्ठ – प्रभारी डॉ. भागवत कराड; सहप्रभारी जयसिंग कृष्णराव चव्हाण
आध्यात्मिक समन्वय प्रकोष्ठ – तुषार भोसले
ट्रान्सपोर्ट प्रकोष्ठ – अनुप मोरे
पदवीधर प्रकोष्ठ – सुनील लोढा
दक्षिण भारतीय प्रकोष्ठ – राजेश पिल्ले
‘बेटी बचाओ-बेटी पढाओ’ प्रकोष्ठ – अल्पा अगरवाल
जैन समाज प्रकोष्ठ – मंगलप्रभात लोढा
सेवाभावी संस्था (NGO) संपर्क प्रकोष्ठ – डॉ. विनय सहस्रबुद्धे
ज्येष्ठ कार्यकर्ता प्रकोष्ठ – आमदार सुनील कर्जतकर
आयुष्मान भारत प्रकोष्ठ – डॉ. सुजय विखे पाटील
ग्राम विकास व पंचायतराज प्रकोष्ठ – सुधाकर भोयर
सोशल मीडिया प्रकोष्ठ – श्वेता शालिनी
फ्रेन्ड्स ऑफ बीजेपी प्रकोष्ठ – उषा वाजपेयी
IT प्रकोष्ठ – तेजस मालविया
क्रीडा प्रकोष्ठ – केदार जाधव
बंगाली प्रकोष्ठ – शुभागत दास
रेल्वे प्रवासी प्रकोष्ठ – कैलास वर्मा
अभियंता प्रकोष्ठ – आमदार प्रशांत ठाकूर
राजस्थानी प्रकोष्ठ – देवीसिंग पुरोहित
मीडिया प्रकोष्ठ – केशव उपाध्ये
सुशासन प्रकोष्ठ – प्रदीप पेशकार
परराष्ट्र संबंध प्रकोष्ठ – आमदार सुनील राणे
तृतीयपंथी प्रकोष्ठ – डॉ. सान्वी जेठवा.
दरेकर, भारती पवार, शेलार यांच्यासह अनेक दिग्गजांना जबाबदारी

या फेरबदलात प्रवीण दरेकर, डॉ. भारती पवार, आशिष शेलार, गोपीचंद पडळकर, भागवत कराड, मंगलप्रभात लोढा आणि सुजय विखे पाटील यांसारख्या प्रमुख नेत्यांचा समावेश आहे. त्यामुळे भाजपने विविध सामाजिक आणि व्यावसायिक समूहांपर्यंत पक्षाची संघटनात्मक पोहोच वाढवण्याचा प्रयत्न केल्याचे दिसते.

विशेष म्हणजे सोशल मीडिया आणि IT प्रकोष्ठांनाही स्वतंत्र जबाबदारी देण्यात आली आहे. सध्याच्या डिजिटल राजकारणात सोशल मीडिया हा पक्षांच्या प्रचाराचा आणि जनसंपर्काचा महत्त्वाचा भाग बनला आहे. त्यामुळे या दोन्ही प्रकोष्ठांकडे आगामी काळात विशेष लक्ष राहण्याची शक्यता आहे.

केंद्रीय पातळीवरील बदलांनंतर महाराष्ट्रातही फेरबदल
याआधी १७ ऑगस्ट रोजी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी पक्षाच्या नव्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांची घोषणा केली होती. या राष्ट्रीय टीममध्ये विनोद तावडे यांच्यासह स्मृती इराणी, सुनील बन्सल आणि बिप्लब कुमार देब यांना राष्ट्रीय सरचिटणीसपदाची जबाबदारी देण्यात आली.

त्यानंतर महाराष्ट्रातील प्रकोष्ठांची नवी रचना जाहीर झाल्याने भाजपमध्ये संघटनात्मक पुनर्रचनेची प्रक्रिया सुरू असल्याचे चित्र आहे.

ताज्या बातम्या

Nashik News : संकटाच्या काळात बांधावर पोहोचा; कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंचे अधिकार्‍यांना...

0
नाशिक |प्रतिनिधी| Nashik पावसातील खंडामुळे निर्माण झालेली पीक परिस्थिती, पीक विमा, वीजपुरवठा आणि शेतकर्‍यांच्या नुकसानभरपाईच्या प्रश्नांवर शासनाने गांभीर्याने लक्ष केंद्रित केले असून, ङ्गशेतकरी प्रथमम या...