अहमदनगर । प्रतिनिधी
मुंबई मला नगर जिल्हा सहकारी बँकेची आता काळजी वाटायला लागलीय. आज तिथं कशी आणि कोणती लोकं बसलीत, त्यावर भाष्य न केलेलं बरं. तिथं काय शिजतंय ते सगळ्यांना माहिती आहे, असा टोला शरद पवार यांनी भाजप नेते मंत्री राधाकृष्ण विखे आणि शिवाजी कर्डिले यांचे नाव न घेता लगावला.
जी. एस. महानगर बँक व नगर जिल्हा सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष (कै.) उदय शेळके यांच्या नावाने सुरू होणाऱ्या उदय शेळके फाउंडेशनचे बोधचिन्ह आणि संकेतस्थळ अनावरण सोहळा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते गुरूवारी मुंबईत झाला. त्यावेळी त्यांनी नगर जिल्हा सहकारी बँकेच्या भवितव्याविषयी विधान केले.
तसंच सॉलिसीटर (कै.) गुलाबराव शेळके आणि त्यांचे चिरंजीव (कै.) उदय शेळके यांनी सहकारात दिलेल्या योगदानाच्या आठवणींना उजाळा दिला. या दोघांनंतर बँकेची धुरा सांभाळत असलेल्या गीतांजली शेळके यांचे कौतुक करत बँकेविषयी कोणताही प्रश्न असेल, अडचणी असतील, तर मांडत चला, त्यावर मार्ग काढण्याचा नक्की प्रयत्न करेल, अशी शरद पवार यांनी ग्वाही दिली.
हे हि वाचा : ‘मविआ’त मुख्यमंत्रीपदाचा दावेदार कोण? उद्धव ठाकरेंचं मोठं विधान
मुंबईमध्ये झालेल्या या कार्यक्रमात काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठनेते आ. बाळासाहेब थोरात, माजी केंद्रीय राज्यमंत्री आनंदराव अडसूळ, खा. नीलेश लंके, राज्य बँकेचे अध्यक्ष विद्याधर अनासकर, पद्मश्री पोपटराव पवार, माजी आमदार सुधीर तांबे, ज्येष्ठ नेते अरुण कडू पाटील उपस्थित होते. शरद पवार यांनी गुलाबराव यांच्यानंतर उदय आणि त्यांच्यानंतर गीतांजली शेळके यांनी बँकेची जबाबदारी संभाळत आहेत. उदय शेळके यांनी नगर जिल्हा सहकारी बँकेचे देखील नेतृत्व केले.
महाराष्ट्रात नगर जिल्हा सहकारी बँक देखील दिग्गज बँकेपैकी एक आहे. पण बाळासाहेब थोरात आता या बँकेविषयी काळजी वाटते, असे म्हणत आज तिथं कशी आणि कोणती लोकं बसलीत त्यावर भाष्य न केलेलं बरं. तिथं काय शिजयंत ते सगळ्यांना माहिती आहे, असे टोला लगावला. नगरमध्ये सहकारी कारखान्याच उगम नगर जिल्हा सहकारी बँक आणि महानगरसारख्या बँकांमुळे झाला. कारखानदारी वाढली. अनेक कारखाने उत्तम चालू आहेत. बाळासाहेब थोरात यांच्या कारखान्याचे व्यवस्थापन उत्तम आहे. लौकीक आहे. बँकेचे काही प्रश्न असतील, तर हक्काने माझ्याकडे या, प्रश्न मांडा, त्यावर मार्ग काढण्याचा नक्कीच प्रयत्न करेल, असे शरद पवार यांनी आश्वासन दिले.
हे हि वाचा : विदर्भात भाजपला मोठा धक्का! माजी खासदाराचा पक्षाला रामराम, काँग्रेसचा ‘हात’ हाती
पवारांनी नगरची चिंता करू नये; बँका, संस्था चालवण्यास जिल्ह्यातील नेतृत्व सक्षम
शरद पवार यांनी नगर जिल्ह्याची चिंता करायचे सोडून दिले पाहिजे. संस्था, बँका, कारखाने चालवण्यात जिल्ह्याचे नेतृत्व समर्थ आहे. त्यामुळे आमची चिंता करण्याचे अजिबात कारण नाही. जिल्ह्याचे लोक समर्थ आहेत. एवढे वर्ष महाराष्ट्राचे सहकार क्षेत्र तुमच्या भोवती फिरते ठेवले. ते आता संपुष्टात येत आहे. याची त्यांच्या मनात खंत आहे, असे प्रत्युत्तर महसूल मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना दिले.
मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या वायबी चव्हाण सभागृहात उदय गुलाबराव शेळके फौउंडेशनच्या बोधचिन्ह अनावरण व उद्घाटन पवार यांच्या हस्ते गुरुवारी झाले होते. यावेळी त्यांनी विखे पाटील व शिवाजी कर्डिले यांचे नाव न घेता टीका केली होती. त्याला शुक्रवारी नगरमध्ये पालकमंत्री विखे पाटील यांनी उत्तर दिले. विखे पाटील म्हणाले की खंडकरी शेतकऱ्यांसाठी कॉ. माधवराव गायकवाड आणि स्व. बाळासाहेब विखे पाटील यांनी लढा उभा केला. न्यायालयापर्यंत लढाई दिली. खंडकरींच्या जमिनी द्यायला सुरुवात झाली आहे. त्या जमिनी भोगवटा दोनच्या एक करताना पूर्वीच्या सरकारने करता येत नाही असे म्हटले होते.
हे हि वाचा : आर्मीमध्ये नोकरीचे आमिष दाखवून तरूणांची फसवणूक
आकारी जमिनी खंडाने दिलेल्या नाहीत, अधिगृहित केलेल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना देण्यात अडचण आहे, असे म्हटले होते. परंतु कारखाना बंद पडल्याने आहे त्या स्थितीत शेतकऱ्यांना जमिनी देण्याची गरज होती. मागच्या महसूल मंत्र्यांनी अॅडव्हकेट जनरल कुंभकोणी यांना आपल्याला जमिनी शेतकऱ्यांना परत करायच्या नाहीत, असे सांगितले होते. त्यामुळे आम्ही शेतकऱ्यांना विरोध केला असे सांगितले होते. पूर्वीचे महसूल मंत्री हे शेतकरी विरोधी होते, अशी टिका त्यांनी केली. कोणते महसूल मंत्री अशी विचारणा केल्यावरते तुम्हा शोधा असे उत्तर त्यांनी यावेळी दिले.