Friday, November 22, 2024
Homeब्रेकिंग न्यूजलिंबाच्या झाडापासून गोड फळांची अपेक्षा करुच नका, जसा बाप तशीच लेक; भाजप...

लिंबाच्या झाडापासून गोड फळांची अपेक्षा करुच नका, जसा बाप तशीच लेक; भाजप आमदाराची सुप्रिया सुळेंवर शेलक्या भाषेत टीका

मुंबई | Mumbai
अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये विविध विषयांवरुन आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहे. जरांगे-शिंदे-पवारसे बैर नही,देवेंद्र फडणवीस तेरी खैर नही, अशी टीका सुप्रिया सुळे यांनी केली होती. त्यांच्या या टीकेवर भाजपा आमदार गोपिचंद पडाळकर यांनी प्रत्यूत्तर दिले आहे. लिंबाच्या झाडापासून गोड फळांची अपेक्षा करुच नका. जसा बाप तशीच लेक असे म्हणत पडळकरांनी शरद पवारांसह सुप्रिया सुळेंवर जोरदार निशाणा साधला.

जरांगे – शिंदे आणि पवार हे तिघही मराठा म्हणून जरांगे-शिंदेंबद्दल बोलायचं नाही. देवेंद्र फडणवीस ब्राम्हण म्हणून पद्धतशीर टार्गेट केले जातेय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे नाव घेऊन संभ्रम निर्माण केला जातोय मुख्यमंत्र्यांनी यावर हस्तक्षेप करावा, अशी मागणी पडाळकर यांनी केली.

- Advertisement -

सुप्रिया सुळे या अजित पवार यांच्याबद्दल सहानुभूती दाखवू नका असे बोलतात. अजित पवार तिकडे लाडकी बहिण योजनेसाठी राज्यभरात फिरत आहेत. पण इथे सुप्रिया सुळे त्यांच्यातली ‘किडकी बहिण’ महाराष्ट्राला दाखवत असल्याचे गोपीचंद पडळकर म्हणाले.

पडळकर पुढे म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांना नियोजनबद्ध पद्धतीने कसं टार्गेट केलं जातंय, त्यांच्यावर हल्ला केला जातोय, तो हल्ला करून घेण्यासाठी काही माणसं पेरायची, विशिष्ट संघटनांना बळ द्यायचे, काही पत्रकारांना हाताशी धरायचे आणि देवेंद्र फडणवीसांवर जातीयवादातून टीका करायची. स्वत:ला पुरोगामी म्हणवून घ्यायचे आणि जेव्हा राजर्षी शाहू महाराजांचे वारस छत्रपती संभाजीराजेंना खासदारकी दिली तेव्हा पूर्वी छत्रपती पेशव्यांना नेमायचे आणि आता पेशवे छत्रपतींना नेमतायेत असं विधान द्यायचे. देवेंद्र फडणवीसांनी राज्यसभा देण्याआधी शाहू महाराजांच्या वारसांना यांनी कधीही खासदारकी दिली नव्हती असा आरोप त्यांनी केला.

आज महाराष्ट्रात जे जातीयवादाचा विष पेरलं जातेय त्याकडे महाराष्ट्रातील जनता सूज्ञपणे पाहत आहे. पवारांचा एक फॉर्म्युला आहे, पुरोगामीत्वाच्या बाता हाणायाच्या आणि जातीयवादावर चर्चा घडवायच्या. देवेंद्र फडणवीस तुम्हाला पुरुन उरले, ते कशातच सापडत नाहीत, तर त्यांच्या जातीवरती बोला, हा प्रकार सुरु असल्याचे पडाळकर यांनी सांगितले.

लहानपणापासून शरद पवारांकडून ज्या सुप्रिया सुळे शिकल्या, पवार हे जातीवादाचं विद्यापीठ आहेत. त्यामुळे लिंबाच्या झाडापासून गोड फळाची अपेक्षा करणे चुकीचे आहे तसे जसा बाप तशी लेक असा निशाणाही पडळकरांनी सुप्रिया सुळेंवर साधला.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या